अ‍ॅपशहर

'पीसीओएस'ग्रस्त मुलींच्या संख्येत वाढ; 'या' गोष्टी ठरणार फायदेशीर

रक्ताची कमतरता टाळण्यासाठी लोहयुक्त अन्नाचे सेवन करावे, पालक, सुकामेवा, अंडी आणि ब्रोकोलीमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. याचा रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे. योग्य वजन ठेवण्यासाठी व्यायाम करणेही गरजेचे आहे, असे मार्गदर्शन स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वीणा औरंगाबादवाला यांनी केले.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 9 Oct 2022, 9:43 am
मुंबई : केवळ प्रौढ महिलांनाच नव्हे, तर किशोरवयीने मुलींमध्ये ‘पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम’च्या (पीसीओएस) समस्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. लठ्ठपणा, बैठी जीवनशैली आणि अनुवंशिकता हे पीसीओएस होण्यामागचे मूळ कारण असू शकते, याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pcos
'पीसीओएस'ग्रस्त मुलींच्या संख्येत वाढ


किशोरवयातील समस्यांकडे पालकांनी विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि वेळेवर वैद्यकीय उपचार करणे आवश्यक आहे. याशिवाय संतुलित आहार घेणे, दररोज व्यायाम करणे, तणावमुक्त राहणे आणि वजन कमी ठेवल्यानेही मदत होऊ शकते, असाही सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. पीसीओएस हे किशोरवयीन मुली आणि महिलांमध्ये संप्रेरकांच्या असंतुलनामुळे दिसून येते. बैठी जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव, तणाव, अनियमित मासिक पाळी, जंकफूडचे जास्त सेवन, जास्त वेळ टीव्ही पाहणे, झोपेच्या अनियमित वेळा यांसारख्या काही गोष्टींमुळे वजन वाढते. वाढत्या वजनामुळे पीसीओएससारख्या समस्या दिसून येतात. पीसीओएस असलेल्यांमध्ये अँड्रोजनचे प्रमाण जास्त असते. इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता, पुरळ आणि त्वचेवर गडद ठिपके येतात. या स्थितीने उच्च रक्तदाब, टाइप टू डायबिटिस, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि वंध्यत्व यांसारखी गंभीर गुंतागुंत होते. दर आठवड्याला पीसीओएसच्या तक्रारी असलेले पाच ते दहा रुग्ण उपचारासाठी दाखल होतात, असे प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रतीमा थमके यांनी सांगितले.

रक्तातील अँड्रोजन संप्रेरकाची पातळी

रक्तातील अँड्रोजन संप्रेरकाची पातळी पाहण्यासाठी रक्त तपासणी केली जाते. अनियमित मासिक पाळी आणि चेहऱ्यावरील केसांची वाढ, यांसारख्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी काही औषधे दिली जातात. पुरेसे पाणी पिण्याचा प्रयत्न करा. तेलकट, मसालेदार, हवाबंद डब्यातील आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा, जास्त रक्तस्राव होत असेल, तर रक्ताची कमतरता टाळण्यासाठी लोहयुक्त अन्नाचे सेवन करावे, पालक, सुकामेवा, अंडी आणि ब्रोकोलीमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. याचा रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे. योग्य वजन ठेवण्यासाठी व्यायाम करणेही गरजेचे आहे, असे मार्गदर्शन स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वीणा औरंगाबादवाला यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज