अ‍ॅपशहर

करोनामुक्त डॉक्टरांकडून वाढते प्लाझ्मादान

करोनामुक्त झालेल्या मुंबईकरांकडून प्लाझ्मादानाला मिळणारा प्रतिसाद वाढता नसला तरीही करोनासंसर्गातून मुक्त झालेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मात्र या उपक्रमाला भक्कम पाठिंबा दिल्याचे चित्र आहे. डॉक्टरांनीही प्लाझ्मादान करून करोनाग्रस्तांची मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Maharashtra Times 18 Jul 2020, 8:25 am
मुंबई : करोनामुक्त झालेल्या मुंबईकरांकडून प्लाझ्मादानाला मिळणारा प्रतिसाद वाढता नसला तरीही करोनासंसर्गातून मुक्त झालेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मात्र या उपक्रमाला भक्कम पाठिंबा दिल्याचे चित्र आहे. डॉक्टरांनीही प्लाझ्मादान करून करोनाग्रस्तांची मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भाटिया रुग्णालयातील १० डॉक्टरांनी करोनावर मात केली होती. त्यांनीही प्लाझ्मादान करून करोनाबाधितांना मदत केली. त्यापाठोपाठ दक्षिण मुंबईतील तीन मोठ्या रुग्णालयांतील आठ डॉक्टर, सहा परिचारिकांसह इतर आठ वैद्यकीय कर्मचाऱ्यांनीही प्लाझ्मादान केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम plasma donation


करोनाचा संसर्गातून मुक्त झालेल्या व्यक्तींकडून प्लाझ्माचे मिळाले तर त्याचा वापर करोनाचा संसर्ग असलेल्या व्यक्तींसाठी होऊ शकतो. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर या थेरपीचा प्रभाव व परिणाम किती आहे याचे संशोधन रुग्णालयामध्ये सुरू आहे. त्याला मोठ्या प्रमाणात यश मिळाले तर ही थेरपी मदतगार ठरू शकते. त्यासाठी 'आयसीएमआर'ने मान्यता दिलेल्या रुग्णालयामध्ये प्लाझ्मा संकलन केंद्रांची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाला मदत करण्यासाठी करोनामुक्त झालेल्या डॉक्टरांनीही हातभार लावला आहे. फिजिशिअन डॉ. अमोल पाखरे यांनीही मागील महिन्यात प्लाझ्मादान केले. प्लाझ्मा हा अल्पमुदतीच्या कालावधीमध्ये परत देता येतो. त्यामुळे हे दान करण्यासाठी त्यांनी पुन्हा पुढाकार घेण्याचा मानस व्यक्त केला. रुग्णालयामध्ये रक्तपेढ्यामध्ये सुरक्षित अंतराचे सगळे निकष पाळले जातात. त्यामुळे घाबरून न जाता करोनामुक्त होण्यासाठी रुग्णांना मदत करण्यासाठी प्लाझ्मादान करायला हवा, असे आवाहन त्यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज