म. टा. प्रतिनिधी, मुंबईः दादरमधील कोहिनूर मिलप्रकरणातील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांची गुरुवारी चौकशी केली. यापूर्वी ईडीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुमारे आठ ते साडेआठ तास चौकशी केली होती. त्यामुळे सरदेसाई यांच्या चौकशीतून काय साध्य होईल हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
कोहिनूर मिल प्रकरणासंदर्भात ईडीने सरदेसाई यांना दोन दिवसांपूर्वी चौकशीसाठी नोटीस रवाना केली होती. त्यानुसार सरदेसाई हे सकाळी ११.३० च्या सुमारास ईडीच्या बॅलार्ड पिअर्स येथील कार्यालयात हजर झाले. ईडीने यापूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सुपुत्र उमेश जोशी यांचीही काही तास चौकशी होती. ईडीकडून कोहिनूर मिल प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीमागे राजकीय पार्श्वभूमी असल्याचीही चर्चा सातत्याने केली जात आहे.
कोहिनूर मिल संदर्भात ईडीकडून यापूर्वी राज ठाकरे यांच्यासह उन्मेष जोशी, अन्य भागीदार राजन शिरोडकर यांचीही चौकशी झाली होती. कोहिनूर समूहामध्ये असलेले शेअर्स विकण्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यानंतर आता ईडीकडून कोणाला चौकशीसाठी बोलावले जाणार का, हादेखील प्रश्न चघळला जात आहे.