अ‍ॅपशहर

रेल्वेची घरपोच पाससेवा बंद

लोकलचे मासिक, त्रैमासिक पास घरपोच देण्याची इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) सुविधा प्रतिसादाअभावी बंद केली आहे. प्रवाशांना पाससाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता भासू नये यासाठी महामंडळाने ही सुविधा सुरू केली होती. परंतु, त्यास कमी प्रतिसाद मिळत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

Maharashtra Times 19 Aug 2017, 2:25 am
प्रतिसादाअभावी आयआरसीटीसीचा निर्णय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम irctc close cash on delivery of monthly pass
रेल्वेची घरपोच पाससेवा बंद


म. टा. खास प्र​तिनिधी, मुंबई

लोकलचे मासिक, त्रैमासिक पास घरपोच देण्याची इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) सुविधा प्रतिसादाअभावी बंद केली आहे. प्रवाशांना पाससाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता भासू नये यासाठी महामंडळाने ही सुविधा सुरू केली होती. परंतु, त्यास कमी प्रतिसाद मिळत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

प्रवाशांनी ऑनलाइन पास काढल्यानंतर त्यांना पास घरपोच मिळण्याच्या दृष्टीने महामंडळाने पाच वर्षांपूर्वी ही सेवा सुरू केली होती. त्यात फर्स्ट क्लासप्रमाणे सेकंड क्लासच्या पासचा समावेश होता. प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या या सेवेसाठी सुरुवातीला काही अतिरिक्त रक्कम आकारण्यात येत होती. त्यानंतरही त्याची लोकप्रियता वाढण्यासाठी हे शुल्क रद्द करण्यात आले. परंतु, कालांतराने हा प्रतिसाद घटत गेल्याचा अनुभव महामंडळाला आला.

घरपोच पास दिले जात असले तरी प्रवाशांनी त्याकडे पाठ​ का फिरवली, असा प्रश्न महामंडळाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. जीएसटीमुळे या सेवेवर आणखी परिणाम झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जून २०१७ मध्ये फर्स्ट आणि सेकंड क्लासच्या घरपोच सेवेतील पासची संख्या दोन हजारांपर्यंत घटली. रेल्वे मार्गावरील दैनंदिन प्रवासी संख्या ७२ लाखांच्या आसपास असताना कुरिअरने घरपोच पास मिळण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या फारच कमी असल्याने अधिकारीही नाराज आहेत.

भार वाचला

ही सेवा बंद झाल्याने महामंडळाच्या वेबसाइटवर पडणारा भार कमी झाल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली जात आहे. एका सेवेसाठी द्याव्या लागणाऱ्या लिंक आणि त्यामुळे वेबसाइटवर भार वाढत जातो, असे सांगण्यात आले.

ऑनलाइन विक्री

म​हिना फर्स्ट सेकंड एकूण

जानेवारी १४९२ ९७० २४६२

फेब्रुवारी ९१२ ६२२ १५३४

मार्च १३७३ ९४३ २३१५

एप्रिल १०८६ ७१३ १७९९

मे ९७५ ६५२ १६२७

जून १२४० ८७३ २११

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज