अ‍ॅपशहर

राज्यातील २१ जिल्ह्यांत लम्पीचा शिरकाव; गायीचं दूध किती सुरक्षित; काय म्हणतात तज्ज्ञ?

lumpi disease: राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये लम्पीबाधित पशू आहेत. आतापर्यंत ४३ पशुंचा लम्पीमुळे मृत्यू झाला आहे. लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणास सुरुवात झाली आहे. लम्पीचा परिणाम दूध उत्पादन आणि विक्रीवर झाला नसल्याचं पशुसंवर्धन विभागानं सांगितलं आहे.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Sep 2022, 6:36 pm
मुंबई: देशातील अनेक राज्यांमध्ये लम्पी आजार पसरला आहे. शेकडो पशुंना लम्पीची लागण झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणासह डझनभराहून अधिक राज्यांत लम्पीचा शिरकाव झाला आहे. पशुपालन विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील १९७ जिल्ह्यांमधील पशुधन लम्पीनं बाधित झालं आहे. लम्पीची लागण झालेल्या पशुंची संख्या १६.४२ लाख इतकी आहे. जुलैपासून ११ सप्टेंबरपासून लम्पीमुळे ७५ पशुंचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cow lumpy


राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये लम्पीबाधित पशू आहेत. आतापर्यंत ४३ पशुंचा लम्पीमुळे मृत्यू झाला आहे. लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणास सुरुवात झाली आहे. लम्पीचा परिणाम दूध उत्पादन आणि विक्रीवर झाला नसल्याचं पशुसंवर्धन विभागानं सांगितलं आहे. लम्पीमुळे दूध उत्पादनावर कोणतेही निर्बंध लादण्यात आलं नसल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.
...तर रेल्वेकडून प्रवाशांना फुकटात जेवण; कसा घ्याल लाभ? जाणून घ्या कामाची माहिती
लम्पी नेमकं काय? कशामुळे पसरतो?
लम्पी एक त्वचेचा रोग आहे. लम्पीची लागण झालेल्या पशुंना ताप येतो. त्यांच्या त्वचेवर गाठी येतात. यामुळे त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. संक्रमित डास, माशा आणि अन्य किटकांच्या थेट संपर्कात आल्यानं लम्पी रोग पसरतो. दूषित खाद्य, पाणी आणि हवेच्या माध्यमातून हा रोग पसरतो.
तो बोनेट उघडून दुरुस्ती करत होता, कार अचानक सुरू झाली; अंगावर चढली, पाहा VIDEO
लम्पीबाधित गायींचं दूध किती सुरक्षित?
लम्पी रोग पशुंकडून माणसांपर्यंत पोहोचत नाही. पशुंकडून तो माणसांना होत नाही, अशी माहिती आयव्हीआरआयचे संयुक्त संचालक अशोक कुमार मोहंती यांनी दिली. लम्पी बाधित गायींचं दूध पिता येऊ शकतं. दूध व्यवस्थित उकळून घ्यावं. लम्पीमुळे दुधाच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम होत नाही, असं मोहंती म्हणाले.

लम्पीमुळे स्थानिक स्तरावरील दूध उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. लम्पीचं गांभीर्य पशुच्या रोगप्रतिकारशक्तीवर अवलंबून असतं. लम्पीची लागण झाल्यानंतर जनावरं अशक्त होतात. ताप आणि अन्य लक्षणांचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. लम्पीचा परिणाम दूध उत्पादनावर होऊ शकतो, असं मोहंती यांनी सांगितलं.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख