अ‍ॅपशहर

जवानाने वाचवले मुलीचे प्राण!

महालक्ष्मी रेल्वे स्टेशनवर महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाने प्रसंगावधान राखत एका पाच वर्षीय मुलीचे प्राण वाचवले आहेत.

Maharashtra Times 14 May 2018, 11:18 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mahalaxmi


महालक्ष्मी रेल्वे स्टेशनवर महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाने प्रसंगावधान राखत एका पाच वर्षीय मुलीचे प्राण वाचवले आहेत. सीसीटीव्हीत ही थरारक दृश्यं कैद झाली आहेत. शुक्रवार ११ तारखेला सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

भिवंडीतील मोहम्मद दिलशान यांचं कुटुंब धावत्या रेल्वेत चढत होतं. ट्रेननं वेग घेतल्यानं इजरा नावाच्या त्यांच्या मुलीला यावेळी ट्रेनमध्ये चढता आलं नाही. तोल गेल्यानं मुलगी ट्रेनच्या खाली जाऊ लागली. याचवेळी बाजूला उभ्या असलेल्या जवान सचिन पोळ यांनी प्रसंगावधान राखत मुलीला ट्रेनपासून बाजूला ओढलं आणि तिचे प्राण वाचले.



पाच वर्षांची इजरा आणि तिची आई चर्चगेटला जाण्यासाठी महालक्ष्मी स्थानकावर आल्या. त्याचवेळी लोकल सुरू झाली. चालत्या गाडीत आर्इ चढली आणि तिने इजराला आत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु लोकलचा वेग वाढल्यामुळे मुलीला लोकलमध्ये शिरता आले नाही. उलट इजरा फलाट आणि लोकलच्या पोकळीत अडकली. दोन्ही पाय अडकल्याने ती रेल्वे रुळाच्या दिशेने ओेढली जाऊ लागली असल्याचे प्लॅटफॉर्मवर कर्तव्यावर असलेले महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान सचिन पोळ यांच्या लक्षात आले. पोळ यांनी प्रसंगावधान राखत क्षणार्धात इजराच्या दिशेने झेप घेऊन अवघ्या दोन ते तीन सेकंदात मुलीला बाहेर खेचून काढले. आणखी थोडा विलंब झाला असता तर अनर्थ घडला असता. ११ मे रोजी झालेली ही घटना पश्चिम रेल्वेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज