अ‍ॅपशहर

जयवंत लुकतुके यांचे निधन

‘टाइम्स’ वृत्तसमूहाच्या प्रकाशनांचे कोल्हापुरातील मुख्य वितरक जयवंत रामचंद्र लुकतुके ऊर्फ अप्पा (वय ६७) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे.

Maharashtra Times 19 Apr 2017, 4:00 am
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jayant luktuke dies
जयवंत लुकतुके यांचे निधन


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘टाइम्स’ वृत्तसमूहाच्या प्रकाशनांचे कोल्हापुरातील मुख्य वितरक जयवंत रामचंद्र लुकतुके ऊर्फ अप्पा (वय ६७) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे.

लुकतुके कुटुंबीय शंभर वर्षांहून अधिक काळ कोल्हापुरात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ प्रकाशनाचे वितरक म्हणून कार्यरत आहेत. या परिवारातील तिसऱ्या पिढीतील जयवंत लुकतुके हे महाद्वार रोडवरील बी. टी. लुकतुके एजन्सीचे भागीदार होते. गेले काही दिवस ते आजारी होते. सोमवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी आठच्या सुमारास प्रतिभानगरातील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. महाद्वार रोडवरील बी. टी. लुकतुके एजन्सी येथे त्यांच्या मित्रपरिवाराने पार्थिवास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज