अ‍ॅपशहर

भाजप गुजरातचे हित जपण्यात व्यस्त, बडा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर जयंत पाटील संतापले, लागोपाठ ३ ट्विट

वेदांत ग्रुप आणि फोक्सकॉन कंपनीचा सेमीकंडक्टर प्रोजेक्ट महाराष्ट्रात होणार होता, परंतु हा प्रकल्प आता गुजरातमध्ये होत असल्याचं समोर आलंय. हे वृत्त समोर आल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी भाजपवर शरसंधान साधलं. ज्या प्रकल्पासाठी आम्ही सरकारमध्ये असताना खूप प्रयत्न केले, तो फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जातोय आणि त्यासाठी काही मंडळींनी प्रयत्न केले, असा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर टीका केली आहे. दुसरीकडे टीका आरोपांच्या या गदारोळात मात्र महाराष्ट्राच्या वाट्याला पुन्हा एकदा उपेक्षा आली आहे.

Authored byअक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Sep 2022, 4:10 pm
मुंबई : वेदांत ग्रुप आणि फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. सुमारे एक लाख इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला आहे. मविआने प्रकल्पासाठी पाठपुरावा केला. पण प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावला आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर टीकास्र सोडलंय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Jayant Patil Slam BJP Over Vedanta Foxconn semiconductor manufacturing plant in Gujrat
देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे आणि जयंत पाटील


वेदांत ग्रुप आणि फोक्सकॉन कंपनीचा सेमीकंडक्टर प्रोजेक्ट महाराष्ट्रात होणार होता, परंतु हा प्रकल्प आता गुजरातमध्ये होत असल्याचं समोर आलंय. हे वृत्त समोर आल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी भाजपवर शरसंधान साधलं. ज्या प्रकल्पासाठी आम्ही सरकारमध्ये असताना खूप प्रयत्न केले, तो फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जातोय आणि त्यासाठी काही मंडळींनी प्रयत्न केले, असा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर टीका केली आहे. दुसरीकडे टीका आरोपांच्या या गदारोळात मात्र महाराष्ट्राच्या वाट्याला पुन्हा एकदा उपेक्षा आली आहे. जयंत पाटलांनीही याच मुद्द्यावरुन भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे.

जयंत पाटील म्हणाले, "वेदांत ग्रुप आणि फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. सुमारे एक लाख इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला आहे. महाविकास आघाडीने या गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला होता".

महाराष्ट्राची पुन्हा उपेक्षा, बडा प्रकल्प गुजरातमध्ये, आदित्य ठाकरेंची भाजपवर सडकून टीका!
"या कंपनीच्या शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. गुजरातच्या निवडणूका तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजपा गुजरातचे हित जपण्यात व्यस्त दिसते. महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का?", असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला आहे.


हा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर घालविण्याचा काही जणांचा उद्देश होता : आदित्य ठाकरे

महाविकास आघाडी सरकारने फॉक्सकॉन प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणली होती. ठाकरे सरकार बदलल्यानंतर फॉक्सकॉन प्रकल्पाचं श्रेय देखील शिंदे-फडणवीसांच्या सरकारने घेतलं होतं. पण हा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर घालविण्याचा काही जणांचा उद्देश होता, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजप-शिंदे गटावर केली.
लेखकाबद्दल
अक्षय आढाव
अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख