अ‍ॅपशहर

सूरज पंचोलीविरुद्धच्या खटल्याला स्थगिती

अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येच्या प्रकरणात तिचा मित्र व अभिनेता सूरज पंचोली याच्याविरुद्ध सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी हंगामी स्थग‌तिी दिली.

Maharashtra Times 26 Feb 2016, 4:00 am
जिया खान मृत्यू प्रकरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jiya khan
सूरज पंचोलीविरुद्धच्या खटल्याला स्थगिती


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येच्या प्रकरणात तिचा मित्र व अभिनेता सूरज पंचोली याच्याविरुद्ध सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी हंगामी स्थग‌तिी दिली. तसेच जियाच्या आईने याविषयी याचिका करून सीबीआय तपासात ज्या विसंगती दाखवल्या आहेत, त्यावर दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देशही सीबीआयला दिले.

जियाची आई राबिया खान यांनी जियाच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत होण्यासाठी पूर्वी याचिका केली होती. त्यावरील सुनावणीअंती उच्च न्यायालयाने जुलै, २०१४मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले होते. सीबीआयने तपासाअंती जियाचा ३ जून, २०१३ रोजी झालेला मृत्यू हा आत्महत्येमुळे झालेला आहे, असा अहवाल सत्र न्यायालयात दिला. मात्र, राबिया खान यांनी पुन्हा उच्च न्यायालयात याचिका केली. सीबीआयने घाईघाईत तपास करून अहवाल दिला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी याविषयी संबंधितांची उलटतपासणी केलेली नाही आणि महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्नही केला नाही ,असा दावा राबिया यांनी याचिकेत केला. जिया अमेरिकन नागरिक होती. त्यामुळे तपास कामात अमेरिकेतील एफबीआयला एसआयटीला सहकार्य करण्याची मुभा द्यावी आणि आपल्या याचिकेवरील अंतिम निर्णय होईपर्यंत सत्र न्यायालयातील खटल्याला हंगामी स्थगिती द्यावी, अशी विनंती त्यांनी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज