अ‍ॅपशहर

'त्या' मुलींच्या स्वप्नांसाठी श्वेताचा पुढाकार

मुंबईतील सर्वात मोठा 'रेड लाईट एरीया' अशी ओळख असलेल्या कामाठीपुऱ्यातील एका तरुणीने अमेरिकेतून शिक्षण घेवून आल्यानंतर स्वस्थ न बसता या परिसरातील मुलींचे यूएसला जाण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. श्वेता कट्टी असे या मुलीचे नाव असून ती 'रेड लाईट' परिसरातून थेट अमेरिकेत जावून शिक्षण घेणारी पहिली मुलगी ठरली आहे.

Maharashtra Times 10 Jun 2016, 4:56 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kamathipura girl to work for other kids us dream
'त्या' मुलींच्या स्वप्नांसाठी श्वेताचा पुढाकार

मुंबईतील सर्वात मोठा 'रेड लाईट एरीया' अशी ओळख असलेल्या कामाठीपुऱ्यातील एका तरुणीने अमेरिकेतून शिक्षण घेवून आल्यानंतर स्वस्थ न बसता या परिसरातील मुलींचे यूएसला जाण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. श्वेता कट्टी असे या मुलीचे नाव असून ती 'रेड लाईट' परिसरातून थेट अमेरिकेत जावून शिक्षण घेणारी पहिली मुलगी ठरली आहे.

अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलींना मार्गदर्शन मिळावे यासाठी श्वेता कट्टीला 'कम्युनिटी सेंटर' सुरू करायचे आहे. यासाठी तिची बहिण कविता होसानी आणि शितल जैन मदत करणार आहेत. शितल जैन ही कामाठीपुरात वाढली असून तिला संगीत शिक्षणासाठी अमेरिकेतून स्कॉलरशीप मंजूर झाली आहे.

गरीब घरातील मुला-मुलींना परदेशी शिक्षण घेता यावे यासाठी असंख्य संस्था आहेत परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अशा मुला-मुलींचे यूएसला जाण्याचे स्वप्न साकार होत नाही. अमेरिकेत जावून शिक्षण घेण्याची ज्यांची इच्छा असेल अशा मुला-मुलींना योग्य माहिती पोहोचवण्याचे काम 'कम्युनिटी सेंटर'च्या माध्यमातून करायचा असल्याचा मानस श्वेताने 'स्टुडंट विसा डे' च्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलून दाखविला. श्वेताने अमेरिकेत जावून पदवीचे शिक्षण घेतले असून ती 'रेड लाईट एरीया' परिसरातील पहिली मुलगी ठरली आहे. बार्ड विद्यापीठातून २ वर्ष मानसशास्त्रात शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी तिने कोलोरॅडो येथील वॉटसन विद्यापीठाची निवड केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज