म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
‘महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर ‘आप’च्या नेत्या प्रीती मेनन यांनी केलेले आरोप निराधार आहेत. ‘आप’ने खोटे आरोप करू नयेत, राजकारणात आरोपांची पातळीही राखली पाहिजे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम आदमी पार्टीला फटकारले.
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आरोप होत आहेत. विविध प्रकरणांवरून ते वादात सापडले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी खडसे यांच्या प्रकरणांवर व्टिट केले. ‘आपने केलेल्या आरोपांना कोणताही आधार नाही. तसेच अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बिनबुडाचे आरोप केले जात आहेत’, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही, ‘पक्ष महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पाठीशी आहे’, असे सांगितले. ‘केंद्रातील भाजप सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असून, सरकारने घेतलेले चांगले निर्णय जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मंत्री आणि पक्षाचे नेते यांना विभाग दिला जाईल’, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.