अ‍ॅपशहर

'माझ्यावरील हल्ला ठाकरे सरकार स्पॉन्सर्ड', किरीट सोमय्यांच्या पत्रकार परिषदेतील १० मुद्दे

Kirit Somaiya press conference | संजय राऊत स्वत:हून बोलत नाहीत. उद्धव ठाकरे जे सांगतात तेच संजय राऊत बोलतात, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले. संजय राऊत हे शनिवारी नागपूरमध्ये होते. काल रात्री ते मुंबईत परतले.

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Apr 2022, 10:53 am
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. माझ्यावर झालेला हल्ला ठाकरे सरकारकडून स्पॉन्सर हल्ला होता अशी थेट टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे


इतकंच नाहीतर यावेळी त्यांनी पोलिसांवरही आरोप केले आहे. पोलिसांच्या संगनमताने हा हल्ला झाला आहे. तर माझ्या नावाची खोटी एफआयआर माझ्या सहीसह संजय पांडे यांनी दिली असल्याचंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं. माझी एफआयआर लिहून का घेतली नाही? असाही सवालही यावेळी त्यांनी केला.

दरम्यान, ठाकरे सरकारने माझा मनसुख हिरेन करायचा प्लॅन आखला होता. पण देव आणि मोदी सरकारच्या कृपेमुळे माझा जीव वाचला. काल शिवसैनिकांनी फेकलेला दगड जरा वरती लागला असता तर मी कायमचा आंधळा झालो असतो, असे वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केले.

Kirit Somaiya: 'ठाकरे सरकारला माझा मनसुख हिरेन करायचाय, दगड जरा वरती लागला असता तर आंधळा झालो असतो'
किरीट सोमय्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

- उद्धव ठाकरे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या संगनमताने माझ्यावर हल्ला झाला.

- उद्धट ठाकरेंच्या नेत्यांना बघून घेऊ

- माझ्यावर तीन वेळा हल्ला झाला

- मनसुख हिरनची सुपारी देऊन हत्या केली

- माझ्यावरील हल्ल्यासाठीही ठाकरे सरकार स्पॉन्सर होतं

- मी पोलीस ठाण्यात रात्री साडेनऊ वाजता येणार असल्याचे अगोदरच कळवले होते. त्यानुसार शिवसेनेचे ७० ते ८० गुंड अगोदरच पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. काहीजण पोलीस स्टेशनच्या आवारात उभे होते. आतमध्ये जातानाही त्यांनी मला शिवीगाळ केली.

- पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर मी बाहेर पडण्यापूर्वी माझ्यावर हल्ला होऊ शकतो, असे त्यांना सांगितले होते. मात्र, पोलिसांनी आम्ही शिवसैनिकांना दूर नेले आहे, सगळी चोख व्यवस्था केली आहे, असे सांगितले.

- मात्र, पोलीस ठाण्यातून बाहेर पडताच पोलिसांनी मला शिवसेनेच्या गुंडांच्या हवाली केले. या हल्ल्यासाठी पोलीस आयुक्त संजय पांडे हेच सर्वस्वी जबाबदार आहेत

- मी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी गेल्यानंतरही पोलिसांनी माझे म्हणणे नीट ऐकून घेतले नाही.

- या सगळ्याविरोधात मी केंद्रीय गृहसचिवांकडे तक्रार केली आहे. भाजपचे शिष्टमंडळ सोमवारी केंद्रीय गृहसचिवांना भेटण्यासाठी दिल्लीत जाणार आहे.

- शरद पवार असो अजित पवार, वळसे-पाटील असो किंवा संजय राऊत असो किंवा ठाकरे सरकार हे सगळे गुंडगिरी करतात. दादागिरी करतात घोटाळे करतात, त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागावी.

- ड्रायव्हरने जीवावर खेळून मला बाहेर काढलं. त्या आठ कमांडोंचीही मारपीट झाली पण तरीही त्यांनी मला सुखरूप बाहेर काढलं
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज