म. टा. प्रतिनिधी, मुंबई
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना सागर सोसायटी, ओशिवरा इंडस्ट्रीजच्या मागे लिंक रोड, गोरेगाव येथे घडली. या हल्ल्यात ही १७ वर्षीय तरुणी जखमी झाली असून तिच्यावर सिद्धार्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बांगूरनगर पोलिसांनी शंकर भारद्वाजवर (२०) गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
गोरेगावच्या भगतसिंग नगर, सागर सोसायटीत शंकर भारद्वाज राहतो. पीडित तरुणी देखील त्याच परिसरात राहते. एक वर्षापासून शंकर एकतर्फी प्रेमातून पीडित मुलीच्या मागे लागला होता. अनेकदा त्याने मुलीची वाट अडवून तिच्याजवळ विचारणा देखील केली.
मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे या गोष्टींसाठी वेळ नसल्याचे सांगून मुलीने शंकरला नकार दिला होता. मात्र तरीही शंकर मुलीचा पाठलाग करून तिला वारंवार त्रास द्यायचा. मुलीकडून वारंवार मिळणाऱ्या नकाराला कंटाळलेला शंकर संतप्त झाला होता.
रविवारी सायंकाळी पीडति मुलगी तिच्या घरी जात असताना गोरेगाव लिंकरोड येथे शंकरने मुलीचा रस्ता अडवून पुन्हा विचारणा केली. त्यावेळीही मुलीने नकार दिल्याने संतापलेल्या शंकरने मुलीला शिवीगाळ करत, सोबत आणलेल्या चाकूने तिच्या चेहऱ्यावर वार करून पळ काढला. त्यावेळी मुलीने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी नियंत्रण कक्षाला माहिती देत पोलिसांना बोलावले. बांगूरनगर पोलिसांनी मुलीला तातडीने सिद्धार्थ रुग्णालयात नेले आणि शंकरवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.