अ‍ॅपशहर

Shiv sena News : धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळणार?; कृपाल तुमाणेंचा दावा, आमदार, खासदारांची रिघ!

Eknath Shinde News : मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज शिवाजीपार्कवर दसरा मेळावा होणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीत होणार आहे. या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देणार आहेत. शिंदे गटातील खासदार कृपाल तुमाणे यांनी आज नागपूरमध्ये मोठा दावा केला आहे. २ खासदार आणि ५ आमदार आज शिंदे गटात प्रवेश करतील, असा मोठा गौप्यस्फोट तुमाने यांनी केला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byसचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Oct 2022, 4:09 pm
मुंबई/ नागपूर : उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि शिंदे गटाच्या दसरा ( Eknath Shinde Dasara Melava ) मेळाव्यात आज काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे गटाचा मेळावा होण्याच्या काही तास आधीच शिंदे समर्थक खासदार कृपाल तुमाणे यांनी मोठा दावा केला आहे. शिंदे गटात आज २ खासदार आणि ५ आमदार प्रवेश करणार आहेत. शिंदेंच्या मेळाव्यात आज ५० हून अधिक आमदार दिसतील, असा दावा तुमाणे यांनी केला आहे. दोन्ही लोकसभेचे विद्यमान खासदार आणि पाचही विद्यमान आमदार आहेत. पुढील काळात आणखी १० ते १२ आमदार शिंदे गटात येतील. आणि लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत १६ खासदार शिंदे गटात आलेले दिसतील, असा दावा तुमाणे यांनी केला आहे. यानंतर आता गजानन किर्तीकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eknath shinde news
धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळणार?; कृपाल तुमाणेंचा दावा, आमदार, खासदारांची रिघ! ( फोटो : पाचेंद्रकुमार टेंभरे )


फक्त खासदार आणि आमदारच नव्हे तर पदाधिकारी आणि नेतेही आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. माजी खासदार आणि माजी आमदारही शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. बाळासाहेबांची खरी शिवसेना कोणती आहे आणि बाळासाहेबांचे विचार कोण पुढे घेऊन जात आहे? हे आता नेत्यांना कळलं आहे. हे काम फक्त शिंदे साहेबांच्या नेतृत्वातच होत आहे. हे शिवसैनिकांना कळलं आहे. त्यामुळे आमच्याकडे येण्याचा ओघ जो आहे तो वाढत चालला आहे. अनेक जण संपर्कात आहेत. शेवटी आमच्याकडे शिवसेनेतील १८ पैकी १६ खासदार असतील. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत १६ खासदार शिंदे गटात असतील. एवढचं नव्हे तर राज्यसभेचाही एक खासदार आमच्यासोबत असेल, असा दावा तुमाणे यांनी केला आहे.

खरी शिवसेना कुणाची? शिंदे गटाची जय्यत तयारी


कृपाल तुमाणे यांनी केलेल्या मोठ्या दाव्याने शिंदे गटाची बाजू भक्कम होताना दिसत आहे. धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचे? याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे. ज्याच्याकडे पक्षातील बहुमत त्याला चिन्ह, या आधारवार निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. यासाठी शिंदे गट सक्रिय असून आता आमदार आणि खासदारांसह पदाधिकारी आणि नेत्यांना आपल्या गटा घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ठाकरे गटातील नाराज नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

dasara melava : शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; २ खासदार, ५ आमदार करणार सीमोल्लंघन!

दुसरीकडे, बीकेसी मैदानावर येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याकडून सदस्य नोंदणीचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. बीकेसी मैदान परिसरात येताच हे अर्ज कार्यकर्त्यांच्या हातात ठेवले जात आहेत. त्यामुळे आज एकाच दिवसात शिंदे गटाच्या शिवसेनेत हजारोंच्या संख्येने सदस्य नोंदणी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हेच अर्ज निवडणूक आयोगापुढे सादर करून आम्हीच खरी शिवसेना या शिंदे गटाच्या दाव्याला आणखी बळ मिळणार आहे.

मुंबईत वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात; ५ जण ठार

महत्वाचे लेख