अ‍ॅपशहर

जमीन खचून २५ घरे जमीनदोस्त

महापालिकेच्या कंत्राटदारांतर्फे कुर्ला परिसरातील नाल्यांमध्ये नालेसफाई सुरू असताना, जमीन खचून नाल्याशेजारील २५ घरे आणि दुकाने बुधवारी सकाळी जमीनदोस्त झाली. नाल्यातून गाळ उपसणाऱ्या जेसीबीच्या हादऱ्याने नाल्याशेजारची जमीन खचून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. अपघातात जमीनदोस्त झालेली बहुतांश घरे अनधिकृत असल्याचे सांगितले जाते. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Maharashtra Times 26 May 2016, 4:46 am
कुर्ल्यातील नालेसफाईच्या वेळी झाला अपघात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kurla nala
जमीन खचून २५ घरे जमीनदोस्त

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

महापालिकेच्या कंत्राटदारांतर्फे कुर्ला परिसरातील नाल्यांमध्ये नालेसफाई सुरू असताना, जमीन खचून नाल्याशेजारील २५ घरे आणि दुकाने बुधवारी सकाळी जमीनदोस्त झाली. नाल्यातून गाळ उपसणाऱ्या जेसीबीच्या हादऱ्याने नाल्याशेजारची जमीन खचून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. अपघातात जमीनदोस्त झालेली बहुतांश घरे अनधिकृत असल्याचे सांगितले जाते. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

कुर्ला, नेहरूनगर येथील एस. जी. बर्वे मार्गावरील शिवसृष्टी परिसरातून गेलेल्या नाल्यात पालिकेच्या कंत्राटदाराकडून बुधवारी नालेसफाईचे काम सुरू होते. सकाळी सहापासूनच या नाल्यातील गाळ काढण्यास सुरुवात झाली होती. नाल्यातील गाळ जेसीबीच्या साह्याने काढत असताना, हादऱ्यामुळे बर्वे मार्गावरील नाल्याशेजारील २५ ते ३० घरे आणि दुकानांचा पाया खचत होता. ही बाब नालेसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली नाही. मात्र, काम सुरू असताना, सकाळी सातच्या सुमारास अचानक येथील काही घरे खचल्यानंतर एकच पळापळ झाली. त्यावेळी स्थानिकांनी बचावासाठी अग्निशमन दल आणि पोलिसांना याबाबत कल्पना देली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दालाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. खचलेली घरे आणि दुकानांपैकी बहुतांश घरांचे बांधकाम बेकायदा करण्यात आले असून, ही घरे अनधिकृत असल्याचे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच या सर्वांना घरे रिकामी करण्यासाठी नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पोलिसांनी केली असून, अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान दुकाने अधिकृत असल्याने त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकार यांनी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज