अ‍ॅपशहर

पालिकेच्या दुर्लक्षामुळेच शौचालय दुर्घटना

म टा...

Maharashtra Times 30 Apr 2018, 11:49 am

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

भांडुपच्या पाटीलवाडीमध्ये शनिवारी खचलेल्या सार्वजनिक शौचालयाचा आतला ढाचा कलला होता, तशी तक्रार दहा वर्षांपूर्वी रहिवाश्यांनी केली होती. त्यावेळी एका राजकीय पक्षाने या शौचालयाची डागडुजी केली. आतल्या टाकीची स्वच्छता मात्र गेल्या तीस वर्षांत करण्यात आलेली नाही. त्याबद्दल पालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही या टाकीतला मैला उपसण्यात आला नाही. ही स्वच्छता न झाल्यामुळेच टाकीत वायू निर्माण होऊन त्याचा स्फोट झाल्याची शक्यता रहिवाश्यांनी व्यक्त केली.

पाटीलवाडीमध्ये एकापाठोपाठ एक तीन चाळी आहेत. तिथे दोनशे कुटुंबे राहतात. ३५ वर्षांपूर्वी हे सार्वजनिक शौचालय या तिन्ही चाळींना जोडणाऱ्या एका कोपऱ्यावर बांधण्यात आले. २० शौचकूपे असलेल्या या शौचालयांचा वापर पूर्वी सगळेच चाळकरी करत होते. मात्र दहा वर्षांपूर्वी नगरसेवक निधीमधून येथे सांडपाणी वाहून नेणारी अंतर्गत वाहिनी टाकण्यात आली. ज्यांना शक्य आहे त्यांनी घरामध्ये शौचालये बनवून घेतली. त्यामुळे चाळीतील तीस टक्के रहिवासी या शौचालयांचा वापर करत होते. शाळेला सुट्या लागल्यामुळे काही कुटुंबे गावी गेली होती, अन्यथा या दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढला असता अशी भीती रहिवाश्यांनी व्यक्त केली.

(डागडुजीऐवजी टाइल्स...३)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज