अ‍ॅपशहर

जुन्या पुस्तकांच्या आधारावर झेप

दहावीत घसघशीत ९३.२० टक्क्यांची कमाई करूनही केवळ आर्थिक अडचणीमुळे उच्चशिक्षण घेता येईल की नाही, असा प्रश्न उभा राहिला आहे.

Maharashtra Times 12 Jul 2018, 5:08 pm
आरती विठ्ठल बेलकर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम leap on the basis of old books
जुन्या पुस्तकांच्या आधारावर झेप


AARTI VITHAL BELKAR

९३.२०%

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

सहा वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले, डोक्यावर हक्काचे छप्परही नाही, आई दिवसा पतपेढी आणि संध्याकाळी लहान मुलांची शिकवणी घेऊन दरमहा जेमतेम आठ हजार रुपये कमवून संसाराचा गाडा हाकते आहे. पण तिच्या डोळ्यांत स्वप्न आहे डॉक्टरीचे. त्यासाठी वाटेल ती मेहनत करण्याची तिची तयारी आहे. पण उच्चशिक्षणासाठी पैसे आणायचे कुठून, याची चिंता या कुटुंबाला पडली आहे. हा कहाणी आहे चेंबूर येथे राहणाऱ्या आरती बेलकर हिची. दहावीत घसघशीत ९३.२० टक्क्यांची कमाई करूनही केवळ आर्थिक अडचणीमुळे उच्चशिक्षण घेता येईल की नाही, असा प्रश्न उभा राहिला आहे.

चेंबूर येथील जनतानगर येथे राहणारी आरती बेलकर ही चेंबूरच्या मुक्तानंद शाळेची विद्यार्थिनी. आरतीच्या वडिलांचे २०१२ साली हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यानंतर आईने जवळच्याच एका पतपेढीमध्ये सहा हजार रुपये पगाराची नोकरी मिळवली. घरातच शिकवण्या घेण्यास सुरुवात केली. आतापर्यंतचे शिक्षण आरतीने भावाच्या जुन्या पुस्तकांवर पूर्ण केले. वह्या-पुस्तकांचा खर्च विविध संस्थांकडून मिळणाऱ्या मदतीच्यातून भागवला. अभ्यासात मदतीसाठी कोचिंग क्लास लावला होता, पण त्याची फीसुद्धा एकरकमी भरणे अशक्य होते. ती टप्प्याटप्प्याने भरल्याचे तिची आई सांगते. मुलीच्या कामगिरीचा अभिमान आहे, ती उच्चशिक्षण घेऊन चांगले यश मिळवेल, याचीही खात्री आहे. पण, त्यासाठी आर्थिक तजवीज कशी करायची, हा प्रश्न आरतीच्या आईचे काळीज पोखरतो आहे. (आधी घरची कामे...२)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज