अ‍ॅपशहर

मुंबई: मालगाडी घसरल्याने 'हार्बर' विस्कळीत

कुर्ला स्थानकाजवळ हार्बर मार्गावर पहाटे मालगाडीचा डबा घसरल्याने या मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर रूळ मोकळा करण्यात यश आले असले तरी वेळापत्रक मात्र अजूनही कोलमडलेलं आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना हाल सोसावे लागत आहेत.

Maharashtra Times 17 Nov 2016, 9:05 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम local trains on mumbais harbour lines were running about 15 minutes late
मुंबई: मालगाडी घसरल्याने 'हार्बर' विस्कळीत

कुर्ला स्थानकाजवळ हार्बर मार्गावर पहाटे मालगाडीचा डबा घसरल्याने या मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर रूळ मोकळा करण्यात यश आले असले तरी वेळापत्रक मात्र अजूनही कोलमडलेलं आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना हाल सोसावे लागत आहेत.

आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कुर्ला स्थानकाजवळ मालगाडी घसरली. तेव्हा लोकल वाहतूक सुरू नव्हती. मात्र त्यानंतर डबा रूळांवरून हटवून मालगाडी रवाना करण्यास दोन तास गेल्याने लोकलसेवेचा खोळंबा झाला.

साधारण सहा वाजण्याच्या सुमारास रूळ मोकळा करण्यात यश आलं असलं तरी अनेक लोकलफेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी एक ट्विट करून सकाळी ८.३० वाजताचे अपडेट्स दिले आहेत. त्यात हार्बरवरील लोकल १० ते १५ मिनिटं उशिराने धावत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात कुर्ला स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी अद्यापि आहे. सकाळीच झालेल्या लोकलगोंधळाने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज