अ‍ॅपशहर

'पंचम के पाँच सूर' एकाच व्यासपीठावर

भारतीय सिने संगीतावर स्वत:ची अमीट छाप उमटवणारे प्रतिभाशाली संगीतकार आर. डी. बर्मन तथा पंचमदा यांच्या जादुई सुरावटींची अनुभूती घेण्याची संधी लवकरच मुंबईकरांना मिळणार आहे. निमित्त आहे स्वरदा कम्युनिकेशननं आयोजित केलेल्या मॅजिकल पंचम या संगीत मैफलीचं!

Maharashtra Times 22 May 2017, 3:50 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम magical pancham
'पंचम के पाँच सूर' एकाच व्यासपीठावर


भारतीय सिने संगीतावर स्वत:ची अमीट छाप उमटवणारे प्रतिभाशाली संगीतकार आर. डी. बर्मन तथा पंचमदा यांच्या जादुई सुरावटींची अनुभूती घेण्याची संधी लवकरच मुंबईकरांना मिळणार आहे. निमित्त आहे स्वरदा कम्युनिकेशननं आयोजित केलेल्या 'मॅजिकल पंचम' या संगीत मैफलीचं!

माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात येत्या ३ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही मैफल रंगणार आहे. विशेष म्हणजे, पंचमदांच्या संगीताच्या साथीनं पार्श्वगायन केलेले अमित कुमार, शब्बीर कुमार, शैलेंद्र सिंग, कविता कृष्णमूर्ती व सुषमा श्रेष्ठ हे पाच गायक या मैफलीच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावर येणार आहेत. तब्बल ३० वादकांचा ताफा या कार्यक्रमात सहभागी होऊन पंचमदांचा स्वराविष्कार उलगडून दाखवणार आहे. कार्यक्रमासाठी संपर्क: ९८२०२९९९२८ (विशाल)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज