अ‍ॅपशहर

मेट्रो-५, मेट्रो-६ प्रकल्पांना मंजुरी

राज्य मंत्रिमडंळाने मेट्रो-५ आणि मेट्रो- ६ या प्रकल्पांना मंजुरी दिली असून ठाणे आणि मुंबईतील लाखो प्रवाशांना या प्रकल्पांमुळे दिलासा मिळणार आहे. मेट्रो-५ द्वारे ठाणे, भिवंडी आणि कल्याण या शहरांना जोडले जाणार आहे तर मेट्रो-६ प्रकल्पाने जोगेश्वरी-विक्रोळी मार्गावर होणाऱ्या कोंडीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे.

Maharashtra Times 24 Oct 2017, 5:40 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra cabinet approves metro 5 project that will connect thane bhiwandi kalyan
मेट्रो-५, मेट्रो-६ प्रकल्पांना मंजुरी


राज्य मंत्रिमडंळाने मेट्रो-५ आणि मेट्रो- ६ या प्रकल्पांना मंजुरी दिली असून ठाणे आणि मुंबईतील लाखो प्रवाशांना या प्रकल्पांमुळे दिलासा मिळणार आहे. मेट्रो-५ द्वारे ठाणे, भिवंडी आणि कल्याण या शहरांना जोडले जाणार आहे तर मेट्रो-६ प्रकल्पाने जोगेश्वरी-विक्रोळी मार्गावर होणाऱ्या कोंडीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे.

मेट्रो-५ साठी ८ हजार ४१६ कोटी तर मेट्रो- ६ साठी ६ हजार ६७२ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. हे दोन्ही प्रकल्प २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

मेट्रो प्रकल्पांचा तपशील...

मेट्रो-५: ठाणे-भिवंडी-कल्याण

> खर्च- ८४१६ कोटी
> मार्गाची लांबी- २४ कि.मी.
> एकूण स्थानके- १७
> सहा डब्यांच्या गाड्या
> रोज अपेक्षित प्रवासी- २०२१ मध्ये २.२९ लाख, तर २०३१ मध्ये ३.३४ लाख

स्थानके - कल्याण एपीएमसी, कल्याण स्थानक, सहजानंद चौक, दुर्गाडी किल्ला, कोनगाव, गोव एमआयडीसी, राजनोली गाव, टेमघर, गोपाळ नगर, भिवंडी, धामनकर नाका, अंजुर फाटा, पूर्णा, काल्हेर, कशेळी, बाळकुंभ नाका, कापुरबावडी

मेट्रो-६: स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-कांजुरमार्ग-विक्रोळी

> खर्च अपेक्षित- ६६७२ कोटी
> लांबी- १४.५ कि.मी.
> एकूण स्थानके- १३
> सहा डब्यांच्या गाड्या
> रोज अपेक्षित प्रवासी- २०२१ मध्ये ६.५ लाख, तर २०३१ मध्ये ७.६९ लाख

स्थानके- स्वामी समर्थ नगर, आदर्श नगर, मोमिन नगर, जेव्हीएलआर, श्याम नगर, महाकाली गुंफा, सीप्झ गाव, साकी विहार रोड, राम बाग, पवई तलाव, आयआयटी पवई, कांजुरमार्ग पश्चिम, विक्रोळी पूर्व द्रूतगती महामार्ग.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज