अ‍ॅपशहर

मुख्यमंत्री शिंदेंची तब्येत बिघडल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर?, आमदारांची घालमेल वाढली

Maharashtra News : येत्या उद्या नव्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा होती. या विस्तारात १५ ते १६ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील असं बोललं जात होतं. पण मुख्यमंत्री शिंदेंची प्रकृती बिघडली आहे. यामुळे उद्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्ह नाहीत. त्यात राज्यपाल ६ आणि ७ तारखेला मुंबईत नाही. यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून आता विस्तार कधी होणार? हेही स्पष्ट नाहीए.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Aug 2022, 4:18 pm
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तर उद्या होणार होता. पण आता मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर गेल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली हे याचं मुख्य कारण असल्याचं बोललं जात आहे. याचं आणखी एक कारण म्हणजे राज्यपाल मुंबईत नाहीत. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण खरं कारण हे सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीचं असल्याचं बोललं जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra cabinet expansion news
मुख्यमंत्री शिंदेंची तब्येत बिघडल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर?, आमदारांची घालमेल वाढली


मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे राज्यरात दौरे सुरू आहे. विदर्भात गडचिरोली जाऊन पूरस्थितीची त्यांनी सुरवातीला पाहाणी केली. मराठवाड्यात औरंगाबादचा दौरा केला. पुण्याचा दौरा केला. याशिवाय मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्याही झाल्या. यासर्व दगदगीमुळे मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती बिघडल्याचं बोललं जात आहे. पण आता मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडल्याने मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार हा ५ ऑगस्टला म्हणजे उद्या होईल. आणि पहिल्या विस्तारात भाजपकडून ९, तर शिंदे गटाकडून ७ जण मंत्रिपदाची शपथ घेतील असं बोललं जात होतं. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, दादा भुसे, उदय सामंत यासारख्या नेत्यांची नावं चर्चेत होती. विशेष म्हणजे राजभवनात याची तयारीही सुरू झाल्याची चर्चा होती. पण आता मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यातच राज्यपाल ६ आणि ७ ऑगस्टला मुंबईत नाहीए. एका कार्यक्रमासाठी ते दिल्लीला जाणार आहेत. यामुळे मुंबईत राजभवनात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कुठलीही तयारी नसल्याचं आता सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली, डॉक्टरांकडून सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला

सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे विस्तार रखडला?

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेना पक्ष नक्की कोणाचा? या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट तसेच उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञांनी युक्तिवाद केले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील या प्रकरणाची सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे. या सुनावणीवेळी कोर्टाकडून हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे द्यायचं की नाही, याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडण्याचं हे मुख्य कारण असल्याचं बोललं जात आहे.

Maharashtra Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाची संभाव्य यादी, भाजपकडून दोन सरप्राईज नावं

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज