अ‍ॅपशहर

Maharashtra Lockdown Live Updates: राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन; जाणून घ्या ताजे अपडेट्स...

Maharashtra Lockdown Live Update: महाराष्ट्रात करोना संसर्गाने थैमान घातले आहेत. दररोज ५० ते ६० हजारांच्या पटीने नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळेच संसर्गाची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Apr 2021, 10:26 pm

हायलाइट्स:

  • महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊनसारखे निर्बंध.
  • राज्यात १ मे सकाळी सात वाजेपर्यंत राहणार निर्बंध.
  • करोनाची साखळी तोडण्यासाठी सरकार कठोर.
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम प्रातिनिधिक फोटो
मुंबई: महाराष्ट्रात करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. यात पूर्वीच्या लॉकडाऊनसारखीच अनेक बंधने घालण्यात आली आहेत. या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान पोलीस आणि प्रशासनापुढे असणार आहे. आज रात्री ८ वाजल्यापासून नव्या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ( Maharashtra Lockdown Live Updates )
महाराष्ट्रात पुन:श्च लॉकडाऊन सुरू झाले असून येथे जाणून घ्या ताजे अपडेट्स...

- लॉकडाऊनची अनेक जिल्ह्यांत धडक अंमलबजावणी सुरू. जिल्ह्यांच्या सीमा केल्या जात आहेत सील.

- औरंगाबाद शहराची बॉर्डर आजपासून होणार सील. सहा एन्ट्री पॉइंटवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची केली जाणार कडक तपासणी.

- कोल्हापूर जिल्ह्यात आज रात्रीपासूनच प्रवेशबंदी. तालुक्यातही प्रवेशबंदी. शहर परिसरातील व्यक्ती वस्तू खरेदीसाठी एक किलोमीटर अंतराबाहेर आढळल्यास कडक कारवाई. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली माहिती.

- लोकल प्रवासाबाबत राज्य सरकारच्या नियमावलीचे रेल्वेने केले अनुकरण. सामान्यांसाठी लोकलची दारे बंदच. तिकीट आता काउंटरवरच मिळणार. तिकीट देणारे बाकी सर्व पर्याय तूर्त बंद.

- नव्या नियमावलीनुसार सामान्य प्रवाशांना उपनगरीय लोकल, मुंबई मेट्रो आणि मोने रेल प्रवासास मनाई राहणार आहे.

- एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात केवळ अत्यावश्यक कारणासाठीच जाता येईल. ज्या जिल्ह्यात जाणार तिथे १४ दिवस होम क्वारंटाइन व्हावे लागणार आहे.

वाचा: राज्यात आज रात्री ८ पासून लॉकडाऊन; निर्बंधांबाबत ही आहे नेमकी माहिती...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज