अ‍ॅपशहर

IAS officers transfer: मुंबई म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्यासह पाच अधिकाऱ्यांच्या बदली

करोना संसर्ग वाढत असतानाचा राज्य सरकारकडून प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची मात्रा अवलंबविण्यात आली आहे. आज पाच प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Aug 2020, 6:59 pm
मुंबईः करोना संसर्ग वाढत असतानाचा राज्य सरकारकडून प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची मात्रा अवलंबविण्यात आली आहे. आज पाच प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. 'म्हाडा’चे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह पाच प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IAS officers


मिलिंद म्हैसकर यांची महसूल आणि वन विभागात प्रधान सचिव (वन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, शिर्डीचे साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून के.एच. बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मंत्रालय उपसचिव पदावर बदली झाली आहे.

नवी मुंबईतील जलस्वराज्य प्रोजेक्टचे प्रकल्प व्यवस्थापक अजय गुल्हाने यांची चंद्रपुरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आल्या आहेत. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव संजय खंदारे यांची महाजेनकोच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वाचाः संजय राऊत, आदित्य ठाकरेंची नार्को चाचणी करावी: भाजप


दरम्यान, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर जिल्हाधिकारीपदी पूर्णवेळ अधिकाऱ्याची नेमणूक होईपर्यंत अतिरिक्त कार्यभार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. राम हे रविवारी पुण्याहून दिल्लीला रुजू होण्यासाठी रवाना झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदाचा अतिरिक्त कार्यभार आयुष प्रसाद यांच्याकडे देण्यात आला आहे.

वाचाः भाजपचे आमदार फुटणार नाहीत; चंद्रकांतदादांनी मांडलं 'हे' गणित!

या पदासाठी विविध अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये हाफकिन इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त सुहास दिवसे, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी डॉ. देशमुख यांचे नाव आघाडीवर आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज