अ‍ॅपशहर

महाविकास आघाडीकडून राज्यपालांना १६२ आमदारांच्या सह्यांचे पत्र

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष दिल्लीत पोहोचला असतानाच, आज सकाळी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला. १६४ आमदारांच्या सह्यांचं पत्र त्यांनी राज्यपालांना दिलं आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्यानं आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी तात्काळ पाचारण करण्यात यावं, असं त्यांनी पत्राद्वारे सांगितलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Nov 2019, 1:07 pm

सस्पेन्स वाढला; सत्तापेचावर सुप्रीम कोर्ट उद्या निर्णय देणार

मुंबई: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष दिल्लीत पोहोचला असतानाच, आज सकाळी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला. १६४ आमदारांच्या सह्यांचं पत्र त्यांनी राज्यपालांना दिलं आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्यानं आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी तात्काळ पाचारण करण्यात यावं, असं त्यांनी पत्राद्वारे सांगितलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम NCP-Congress-Shivsena
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राजभवनात जाऊन १६२ आमदारांच्या पाठिंब्यांचं पत्र सादर केलं.


शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विनायक राऊत, आझमी, केसी. पडवी आणि जयंत पाटील आदी नेते आज सकाळी १० वाजताच्या सुमारास राजभवनात पोहोचले. त्यांनी १६२ आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांना दिले आणि पुरेसे संख्याबळ असल्यानं राज्यपालांनी आम्हाला तात्काळ सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित करावं अशी विनंती केली. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांनी यापूर्वी विधानसभा सदस्यांचे पुरेसे संख्याबळ नसल्यानं सरकार स्थापण्यास असमर्थता दर्शवली होती. आताही त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. आजही त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळं ते बहुमत सिद्ध करू शकत नाहीत. ते बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्यानंतर शिवसेना सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहे, असं या पत्रात म्हटलं आहे.





शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर सहकारी पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या सह्यांची यादी या पत्रासोबत जोडत आहोत. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळं आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी तात्काळ निमंत्रित करण्यात यावं, अशीही मागणी या पत्राद्वारे केली आहे.



फडणवीस बहुमत सिद्ध करू शकत नाहीत!

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र ते संख्याबळाअभावी बहुमत सिद्ध करू शकत नाहीत, असं महाआघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात आलं आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं. आम्ही राज्यपालांकडे १६२ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिलं आहे. बहुमत महत्वपूर्ण आहे. बहुमत असलेल्यांना संधी मिळायला हवी, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

अजित पवारांच्या पत्रात काय? SCत उलगडा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज