अ‍ॅपशहर

करोनाच्या लढ्यात अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांचा होणार सन्मान

राज्यात करोनाचा कहर वाढत असताना पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण दिवसेगणिक वाढतच आहेत. त्याचं मनोबल वाढवण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jun 2020, 4:55 pm
मुंबईः करोनाविरुद्धच्या लढ्यात आपल्या जीवाची बाजी लावून झटणाऱ्या पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा विशेष पदकानं सन्मान करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra police


करोनाच्या युद्धात लढणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची तुलना थेट लष्कराच्या जवानांसोबत केली आहे. आपले जवान चीनच्या सीमेवर शौर्य दाखवत आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलिसही करोनाची ही लढाई लढत आहेत. असं ट्विट अनिल देशमुख यांनी केलंय. त्याचबरोबर, य लढाईत अगदी ग्रामीण पातळीपर्यंत पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य निभावलं आहे. त्या सर्व पोलिसांना आपत्ती सेवा पदक देवून त्यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात येणार आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.


वाचाः करोनामुक्तीकडे वाटचाल असलेल्या 'या' जिल्ह्यात पुन्हा आढळले रुग्ण

दरम्यान, मुंबई पोलिस दलात करोनाबाधितांची संख्या आधिक आहे. यासाठीच पोलिसांसाठी वरळी पोलिस कॅम्पमध्ये १०० खाटांचे कोव्हिड सेंटर उभं करण्यात येत आहे. या सेंटरमध्ये करोनाबाधित पोलिसांवर उपचार केले जाणार आहेत. वरळी भागात मोठ्या प्रमाणात पोलिस वसाहत आहे. या वसाहतीमध्येही आतापर्यंत अनेक पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. पोलिसांमधील वाढता संसर्ग ही पोलिस कटुंबीयांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांवर योग्य उपचार करण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या आहेत.

आणखी वाचा: ...तर हरिभाऊ जावळेंचा जीव वाचला असता: खडसे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज