अ‍ॅपशहर

'फडणवीसांसारखा मोठ्या मनाचा माणूस नाही', मुख्यमंत्री पदाच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच बोलले एकनाथ शिंदे

eknath shinde | एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज संध्याकाळी सात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी माहिती फडणवीसांनी दिली.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jun 2022, 5:39 pm
मुंबई : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज संध्याकाळी सात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी माहिती फडणवीसांनी दिली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत काय मुद्दे मांडले, वाचा सविस्तर...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Maharashtra new cm


एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे...

- संख्याबळानुसार मुख्यमंत्रिपद ते घेऊ शकले असते. पण मोदींनी फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला

- बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय त्यांनी घेतला

- देवेंद्रजीसारखा मोठ्या मनाचा माणूस बघायला मिळणार नाही. ही ऐतिसाहिक घटना आहे

- देवेंद्र फडणवीसां इतका मोठ्या मनाचा माणूस पाहिला नाही. मुख्यमंत्रीपद दुसऱ्याला देण्याचा उदारपणा दुर्मीळ आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, भाजपचा पाठिंबा; शिंदे-फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

- नाईलाजामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. महाविकास आघाडीमुळे अनेक निर्णय घेता येत नव्हते. राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो महाराष्ट्रात एक मजबूत सरकार दिसेल.

- फडणवीसांच्या मोठ्या मनाने एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवले

- फडणवीसांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

- नरेंद्र मोदी, अमित शाहांनी संधी दिल्याबाबत धन्यवाद
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख