अ‍ॅपशहर

Maharashtra Politics: शिवसेनेत 'महा'नाराजी, राजकीय उलथापालथीत अजित पवार कुठे? त्यांचं काय चाललंय?

शिवसेनेचे आमदार नॉट रिचेबल असताना अजित पवार मंत्रालयात बैठका घेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात नियमित कामकाजाची आढावा बैठक घेण्यात आली

Authored byअनिश बेंद्रे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jun 2022, 2:34 pm
मुंबई : शिवसेनेचे २० आमदार नॉट रिचेबल झाल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर संकट ओढावलं आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नाराज असून त्यांच्यासह मुख्यत्वे औरंगाबाद, रायगडमधील वीसहून अधिक शिवसेना आमदार गुजरातमधील सुरत येथे असल्याची माहिती आहे. मात्र या धामधुमीत उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांसमोर आलेले नाहीत. किंवा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून कुठलीही प्रतिक्रियाही दिलेली नाही. त्यामुळे अजित पवार कुठे आहेत, त्यांचं काय चाललंय, असे प्रश्न निर्माण होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ajit Pawar Uddhav Thackeray
अजित पवार कुठे आहेत?


अजितदादांच्या बैठका

शिवसेनेचे आमदार नॉट रिचेबल असताना अजित पवार मंत्रालयात बैठका घेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात नियमित कामकाजाची आढावा बैठक घेण्यात आली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटरवरुन देण्यात आली आहे.



एवढ्या मोठ्या राजकीय उलथापालथी होत असतानाही अजित पवार बैठका घेण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला काहीच धोका नाही, असं वाटत असल्याने ते निश्चिंत असावेत किंवा अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या मनात काहीतरी वेगळंच सुरु असावं, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

हेही वाचा : एकनाथ शिंदेंना ३७ आमदार फोडावे लागतील नाहीतर पुन्हा 'फसलेल्या बंडाची कहाणी...!'

शरद पवार कुठे आहेत?

विधानपरिषद निवडणुकीसोबतच राष्ट्रपती निवडणुकांचीही मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. त्यासाठी विरोधकांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या चुरशीच्या निवडणुका असतानाही शरद पवार दिल्लीत आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी लक्षात घेत शरद पवार यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती मिळत आहे. मात्र अद्याप ते मुंबईला परतल्याची माहिती नाही.

हेही वाचा : शिवसेना अ‍ॅक्शनमध्ये; शिंदे समर्थक आमदारांना हॉटेलमधून उचललं, गाडीत टाकलं अन् थेट 'वर्षा'वर नेलं

सुरतला पोहचलेल्या संभाव्य शिवसेना आमदारांची यादी

१. एकनाथ शिंदे - कोपरी
२. अब्दुल सत्तार - सिल्लोड, औरंगाबाद
३. शंभुराज देसाई - पाटण, साताराट
४. संदिपान भुमरे - पैठण, औरंगाबाद
५. उदयसिंह राजपूत - कन्नड, औरंगाबाद
६. भरत गोगावले - महाड, रायगड
७. नितीन देशमुख - बाळापूर, अकोला
८.अनिल बाबर - खानापूर-आटपाडी, सांगली
९.विश्ननाथ भोईर - कल्याण पश्चिम
१०. संजय गायकवाड - बुलडाणा
११. संजय रायमूलकर - मेहकर
१२. महेश शिंदे - कोरेगाव, सातारा
१३. शहाजी पाटील - सांगोला, सोलापूर
१४. प्रकाश आबिटकर - राधानगरी, कोल्हापूर
१५. ज्ञानराज चौगुले - उमरगा, उस्मानाबाद
१६. तानाजी सावंत - परांडा, उस्मानाबाद
१७. संजय शिरसाट - औरंगाबाद पश्चिम
१८. रमेश बोरनारे - वैजापूर, औरंगाबाद

हेही वाचा : एकनाथ शिंदेंसोबत सुरतला जाताच छातीत दुखू लागले; गंभीर अवस्थेत शिवसेना आमदार रुग्णालयात
लेखकाबद्दल
अनिश बेंद्रे
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा 'मास्टरमाईंड' | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव... आणखी वाचा

महत्वाचे लेख