मुंबई : लग्नाआधी देवेंद्रजी एका बैठकीत ३५ पुरणपोळ्या पातेलंभर तुपासह सहज खायचे, असं सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात धमाल उडवून दिली होती. मात्र आता खुद्द फडणवीसांनी आपल्याला पुरणपोळीच आवडत नसल्याचं सांगून पत्नीला तोंडघशी पाडलंय. 'एबीपी माझा' वाहिनीवर बालदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाल गोपाळांसोबत गप्पा मारताना दिसत आहेत. यावेळी एका चिमुरड्याने 'तुम्हाला गोडात सर्वात जास्त काय आवडतं?' असा प्रश्न फडणवीसांना विचारला. त्यावर बोलताना ते म्हणाले, की 'मी पहिलंच सांगतो की मला पुरणपोळी आवडत नाही' फडणवीसांच्या उत्तराची सुरुवात ऐकतानाच वर्गात एकच हशा पिकला.
'माझ्या बायकोच्या एका उत्तरामुळे अनेक लोकांचा समज झालाय की मला पुरणपोळी आवडते. त्यामुळे मी कुठेही गेलो तरी लोक मला पुरणपोळीच देतात' असं देवेंद्र फडणवीसांनी सांगताच चिमुरडे खो-खो हसत सुटले.
बालमोहन विद्यामंदिर शाळेत हा कार्यक्रम रंगल्याचं दिसतंय. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे फडणवीस यांचे शिक्षण बालमोहनमध्ये झालेले नाही. मात्र त्यांचे सध्याचे राजकीय विरोधक असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बालमोहनचे माजी विद्यार्थी आहेत. म्हणजेच ठाकरेंच्याच शाळेत जाऊन फडणवीसांनी हशा पिकवल्याचा गमतीशीर योगायोग पाहायला मिळणार आहे.
पुरणपोळीचा किस्सा काय?
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीवरील किचन कल्लाकार (Kitchen Kallakar) या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तर देवेंद्र फडणवीस हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहिले होते. यावेळी सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे यांनी प्रश्न विचारल्यावर अमृता फडणवीस यांनी पती देवेंद्र फडणवीस यांच्या खाण्याच्या आवडींविषयी सांगितलं होतं.
हेही वाचा : छत्रपतींना बदनाम करणारे चित्रपट निर्माण करणं हा षडयंत्राचा भाग | जितेंद्र आव्हाड
एका बैठकीत देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? असा प्रश्न संकर्षणने अमृता फडणवीस यांना विचारला होता. या प्रश्नावर ते लग्नापूर्वी ३० ते ३५ पुरणपोळ्या सहज पातेलंभर तुपासोबत खायचे, असं उत्तर अमृता फडणवीसांनी दिलं होतं. यावर, लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती? असा प्रश्न विचारला असता, त्यांना ३०-३५ पुरणपोळ्या खाताना पाहण्याची, त्याही मी न बनवलेल्या, असं उत्तर अमृता फडणवीस यांनी दिल्याने धमाल उडाली होती. सोशल मीडियावर यावरुन संमिश्र प्रतिक्रिया उमटली होती.
हेही वाचा : आदित्य ठाकरेंना पाहून राहुल गांधींची कडकडून मिठी; पहिला प्रश्न विचारला, बाबा कसे आहेत?