अ‍ॅपशहर

मुख्यमंत्र्यांना विधान परिषद सदस्यत्व: आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

विधान परिषदेच्या रिक्त जागांपैकी एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Apr 2020, 6:04 am
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवड करण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांतील नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Maharashtra governer


महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्याचा निर्णय मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार या शिफारशीचे पत्रही मंत्रिमंडळाकडून राज्यपालांना पाठवले होते. मात्र जवळपास दोन आठवडे होत आले तरी याबाबत राज्यपालांकडून अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाने सोमवारी महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर राज्यपालांनी तातडीने कार्यवाही करावी या विनंतीचा पुनरुच्चार करण्यात आला होता.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आज, मंगळवारी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. विधान परिषदेच्या दोन रिक्त जागांपैकी एका जागेवर मुख्यमंत्री ठाकरे यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मंत्रिमंडळाची शिफारस त्यांनी राज्यपालांकडे केली.

राज्य सरकार सध्या करोनाविरुद्ध लढा देत आहे. आमच्या सर्वांसह संपूर्ण यंत्रणा ही या लढ्यात सहभागी झाली आहे. मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आज पुन्हा राज्यपालांकडे विधान परिषदेच्या जागेबाबत मंत्रिमंडळ ठरावाचे पत्र सुपूर्द केले, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे दिली.


पोलिसांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री

उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व उजवं का ठरतंय?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज