अ‍ॅपशहर

भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवल्यानेच हत्या

कारागृहातील अधिकाऱ्यांकडून तुरुंगात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत वेळोवेळी आवाज उठवल्यामुळेच, त्याचा सूड घेण्यासाठी मंजुळाची हत्या केल्याचा आरोप मंजुळाचे भाऊ अनंत आणि शरद शेट्ये यांनी केला आहे.

Maharashtra Times 22 Jul 2017, 4:03 am
मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम manjula shetye murdered because she knew of corruption
भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवल्यानेच हत्या


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

कारागृहातील अधिकाऱ्यांकडून तुरुंगात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत वेळोवेळी आवाज उठवल्यामुळेच, त्याचा सूड घेण्यासाठी मंजुळाची हत्या केल्याचा आरोप मंजुळाचे भाऊ अनंत आणि शरद शेट्ये यांनी केला आहे. या हत्याकांडाचा तपास करणारे अधिकारी दुजाभाव करत असल्याचा आरोपही त्यांनी केला असून याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे.

मंजुळाच्या हत्येचा तपास करणारे गुन्हे शाखेचे पोलिस तपासात चालढकल करत आहेत. या हत्येप्रकणात पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबाची प्रत अनेकदा मागूनही दिलेली नाही, त्या जबाबांवर दोघांच्याही सह्या नाहीत. तपास अधिकारी आरोपींना पाठीशी घालत असल्याचे दिसते. त्यामुळे पोलिसांच्या तपासावरही आता विश्वास नसल्याचे मंजुळाच्या दोघा भावांनी सांगितले.

कित्येक वर्षे वॅार्डनचे काम केल्याने तुरुंगातील सर्व गोष्टींची तिला माहिती होती. भायखळा तुरुंगातील भ्रष्टचाराबाबत आवाज उठवल्यानेच आरोपींनी मंजुळाला अमानुष मारहाण करत तिची हत्या केल्याचे मंजुळाचे भाऊ अनंत आणि शरद शेट्ये यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

नार्कोबाबत २ ऑगस्टला चर्चा

मंजुळा हत्येप्रकरणात पुराव्यांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या प्रकरणातील तक्रारदार मरियमचे वकील नितीन सातपुते यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित अधिकारी आणि तपास अधिकाऱ्यांची नार्कोचाचणी करण्याची मागणी सातपुते यांनी न्यायालयात केली आहे. यावर २ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज