अ‍ॅपशहर

अभिमान गीतातील कडवं वगळलं, विधानसभेत गोंधळ

राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी झालेला मराठी अनुवादाचा गोंधळ ताजा असतानाच मराठी भाषा दिनानिमित्त विधानसभेत पार पडलेल्या कार्यक्रमात मराठी अभिमान गीतातील सर्वात शेवटचं सातवं कडवं वगळण्यात आल्यानं विरोधकांनी विधानसभेत जोरदार गोंधळ घातला. सरकारने या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Feb 2018, 11:51 am
मुंबई: राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी झालेला मराठी अनुवादाचा गोंधळ ताजा असतानाच मराठी भाषा दिनानिमित्त विधानसभेत पार पडलेल्या कार्यक्रमात मराठी अभिमान गीतातील सर्वात शेवटचं सातवं कडवं वगळण्यात आल्यानं विरोधकांनी विधानसभेत जोरदार गोंधळ घातला. सरकारने या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marathi abhiman geet maharashtra assembly adjourned amid protest
अभिमान गीतातील कडवं वगळलं, विधानसभेत गोंधळ


मराठी भाषा दिनानिमित्त आज विधानभवनाच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार उपस्थित होते. यावेळी 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' हे अभिमान गीत सादर करण्यात आले. मात्र या गीतातील सातवं कडवं वगळण्यात आलं. ही बाब लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत त्याबाबतचा मुद्दा उपस्थित करत सरकारला जाब विचारला. 'अभिमान गीतातील सातवं कडवं का वगळण्यात आलं? त्यामागचा हेतू काय? असे सवाल करत सरकारने याप्रकाराबाबत माफी मागायला हवी,' अशी मागणी अजित पवार यांनी केली. त्याला विरोधी पक्षातील सर्वच आमदारांनी साथ देत विधानसभेत एकच गोंधळ घातला. विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांसमोरच्या वेलमध्ये येऊन सरकार विरोधात जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे प्रचंड गोंधळ झाला. यावेळी सरकारकडून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र विरोधकांनी त्याकडे दुर्लक्ष करत गोंधळ सुरूच ठेवला. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी १५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

हे आहे सातवं कडवं

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज