अ‍ॅपशहर

मटा हेल्पलाइन: कष्टाचं इंजिनीअरिंग

तिच्या डोळ्यांत स्वप्न आहे केमिकल इंजीनिअर होण्याचे. मुंबईच्या इन्स्टिट्ययूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये तिला प्रवेश घ्यायचा आहे. त्यासाठी गुणही तेवढेच उत्तम लागणार. मेहनत करायची तयारी आहे, मात्र या मेहनतीला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. क्लास लावायचे तर फी लाखभर. एवढे पैसे आणायचे कुठून?... विलेपार्ले येथील माधवराव भागवत हायस्कूलमधील पर्णिका तरळला पडलेला हा प्रश्न!

Maharashtra Times 12 Jul 2017, 3:17 am
पर्णिका प्रमोद तरळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mata helpline
मटा हेल्पलाइन: कष्टाचं इंजिनीअरिंग

PARNIKA PRAMOD TARAL

९०.४०%

टीम मटा, मुंबई

तिच्या डोळ्यांत स्वप्न आहे केमिकल इंजीनिअर होण्याचे. मुंबईच्या इन्स्टिट्ययूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये तिला प्रवेश घ्यायचा आहे. त्यासाठी गुणही तेवढेच उत्तम लागणार. मेहनत करायची तयारी आहे, मात्र या मेहनतीला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. क्लास लावायचे तर फी लाखभर. एवढे पैसे आणायचे कुठून?... विलेपार्ले येथील माधवराव भागवत हायस्कूलमधील पर्णिका तरळला पडलेला हा प्रश्न!

पर्णिकाला दहावीला ९०.४० टक्के गुण मिळाले आहेत. सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या पर्णिकाचा शाळेत तिसरा क्रमांक आला, याचा तिच्या आई-वडिलांना अभिमान वाटतो. मुलगी उच्च शिक्षण मिळवून चांगले यश मिळवेल, याची त्यांना खात्री आहे. मात्र, त्यासाठी आर्थिक तजवीज कशी करायची हा प्रश्न आहे.

आतापर्यंत कोणत्याही क्लासशिवाय शिक्षण पूर्ण केल्याचे पर्णिका सांगते. पर्णिकाचे वडील सिक्युरिटी गार्ड आहेत. तिची आई घरकाम करते. वडिलांनी राज्यशास्त्रामध्ये ग्रॅज्युएशन केले. मात्र नोकरी मिळत नसल्याने त्यांनी सिक्युरिटी गार्डची नोकरी पत्करली. पर्णिका पहिलीत असताना त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईची वाट धरली.

विलेपार्ले येथे महामार्गाला लागून असलेल्या चाळीत हे कुटुंब राहते. सतत वाहनांचा आवाज कानावर पडत राहतो. आजूबाजूच्या घरांमधील टीव्हीचा आवाजही कायम सुरू असतो. अशा परिस्थितीत पर्णिकाने आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही. सकाळी पाचला उठून ती अभ्यासाला बसायची. साडे अकरापर्यंत अभ्यास मग बाराची शाळा. शाळेतून आल्यानंतर पुन्हा अभ्यास. या कष्टांना अखेर फळ मिळालं!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज