अ‍ॅपशहर

अवघड गणिताला डिजिटल आधार

गणित आणि इंग्रजी या विषयांना पर्यायी विषय देण्याच्या पर्यायावर अनेक शिक्षकांनी लाल शेरा मारला आहे. या अवघड विषयांचा प्रवास सोपा करण्यासाठी इतर बोर्डांतर्फे वापरल्या जाणाऱ्या डिजिटल तंत्रांचा फॉर्म्युला एखादा विषय सहजपणे समजावण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे मत अनेक शिक्षकांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

Maharashtra Times 24 Sep 2016, 4:09 am
sourabh.sharma1@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maths and english
अवघड गणिताला डिजिटल आधार


Tweet : @sourabhsMT

मुंबई ः गणित आणि इंग्रजी या विषयांना पर्यायी विषय देण्याच्या पर्यायावर अनेक शिक्षकांनी लाल शेरा मारला आहे. या अवघड विषयांचा प्रवास सोपा करण्यासाठी इतर बोर्डांतर्फे वापरल्या जाणाऱ्या डिजिटल तंत्रांचा फॉर्म्युला एखादा विषय सहजपणे समजावण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे मत अनेक शिक्षकांकडून व्यक्त करण्यात आले आहे. त्यासाठी राज्य शिक्षण मंडळाचेही विशेष प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

दहावीच्या परीक्षेत गणित व इंग्रजी हे विषय विद्यार्थ्यांना अवघड जात असल्याने त्या विषयांसाठी वैकल्पिक विषय देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे. या पार्श्वभूमीवर, देशभरातील इतर शिक्षण बोर्डांकडून सुरू असलेल्या विशेष प्रयत्नांकडे शिक्षकांनी लक्ष वेधले. शिक्षक उल्हास वडोधकर म्हणाले, ‘सध्याच्या घडीला इतर बोर्डांच्या तुलनेत आपले अभ्यासक्रम जवळपास सारखेच आहेत. गणितासारखा विषय विद्यार्थ्यांना नीट समजावण्याकरीता सीबीएसई आणि इतर बोर्डांकडून डिजिटल माध्यमांचा वापर होत आहे. त्यात प्रामुख्याने विषयांचे ज्ञान देणाऱ्या वेगवेगळ्या सीडीज, टॅब यांचा समावेश असतो. आपल्याकडेही डिजिटल पर्यायांचा वापर होतो, मात्र तो फारच कमी आहे.’

‘राज्य शिक्षण मंडळ हा विषय सोपा करण्यासाठी प्रयत्न करीत नाही, असे अजिबात नाही. पण ते प्रयत्न अपुरे आहेत. गणिताचे उदाहरण घेतल्यास लक्षात येईल की, इतर बोर्डांच्या पाठ्यपुस्तकात उदाहरणासह गणित सोडवून दाखविण्याचे प्रकार अधिक आहेत. एकाच प्रकारचे गणित तीन ते चार प्रकारे सोडवून दाखविलेले असते. राज्य शिक्षण मंडळाच्या पुस्तकात तसे नसते. या अशा काही पर्यायांचा विचार झाला, तर गणित विषय नक्कीच सोपा होईल,’ असे दीपक सोनावणे या गणित शिक्षकांनी सांगितले.(क्रमश:)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज