अ‍ॅपशहर

तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर आज, रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाइनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. डाऊन स्लो मार्गावरील वाहतूक डाऊन फास्ट मार्गावरून चालवण्यात येणार आहे.

Maharashtra Times 21 Jan 2018, 5:00 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम megablock


मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर आज, रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाइनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. डाऊन स्लो मार्गावरील वाहतूक डाऊन फास्ट मार्गावरून चालवण्यात येणार आहे.

मुलुंडहून सुटणाऱ्या डाऊन स्लो/सेमी फास्ट मार्गावरील लोकल स. १०.४७ ते दु. ३.५० पर्यंत मुलुंड-कल्याणपर्यंत ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबतील. डाऊन मार्गावरील लोकल कळवा, मुंब्रा, कोपर, ठाकुर्ली येथे थांबणार नाहीत. या प्रवाशांना कल्याण, डोंबिवली, दिवा, ठाणे येथून प्रवास करण्यास मुभा आहे. अप मार्गावर कल्याणहून सुटणाऱ्या फास्ट लोकल सकाळी १०.३७ ते दु. ३.०६ या कालावधीत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकात थांबतील.

हार्बर मार्गावर पनवेल ते नेरुळमध्ये अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर स. ११.३० ते दु. ४.३० वाजेपर्यंत ब्लॉक आहेत. या कालावधीत हार्बरवरील अप आणि डाऊन लोकल वाहतूक स. १०.०३ ते दु. ४.३४ पर्यंत नेरूळ ते पनवेलमध्ये खंडीत राहील.

ट्रान्सहार्बरवर स. ११.०२ ते दु. ४.२६ वाजेपर्यंत ठाण्याहून पनवेलसाठी सुटणारी लोकलसेवा खंडीत राहील. पनवेल-अंधेरी लोकलची वाहतूक बंद राहणार असून प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसएमटी ते नेरूळ आणि वाशी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेचा ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते बोरीवलीपर्यंत स. १०.३५ ते दु. ३.३५ पर्यंत अप आणि डाऊन फास्ट मार्गावर ब्लॉक आहे. या वेळेत अप आणि डाऊन फास्टवरील वाहतूक अंधेरी ते बोरीवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गांवरून चालवण्यात येईल. तसेच काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज