अ‍ॅपशहर

तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

मध्य, हार्बर, पश्चिम मार्गावर आज, रविवार, २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० ते ४.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

Maharashtra Times 28 Aug 2016, 1:51 am
मध्य, हार्बर, पश्चिम मार्गावर आज, रविवार, २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० ते ४.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम megablock on all three line
तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक



मध्य रेल्वे

मरेच्या डाउन स्लो मार्गावर मांटुगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक.

या मार्गावरील स्लो गाड्या स. ११.१२ ते दुपारी ४.२७ वाजेपर्यंत डाउन फास्ट ट्रॅकवरून चालविल्या जातील. मुलुंडनंतर या लोकल पुन्हा स्लो मार्गावरून कल्याणच्या दिशेने रवाना होतील.

डाउन स्लो मार्गावरील लोकल विद्याविहार,कांजुरमार्ग आणि नाहुर स्थानकात थांबणार नाहीत.

अप आणि डाउन फास्ट लोकल वेळेपेक्षा १५-२० मिनिटे उशिराने धावतील.


हार्बर रेल्वे

रविवारी हार्बरवर मानखुर्द ते नेरुळ दरम्यान अप आणि डाउनवर स. ११.१० ते दु. ४.१० वाजेपर्यत मेगाब्लॉक असणार आहे.

सीएसटीहून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणाऱ्या लोकलची सेवा स. १०.११ते ४.१० पर्यंत बंद राहील.

या कालावधीत सीएसटी ते मानखुर्द आणि ठाणे ते पनवेल दरम्यान विशेष लोकल धावतील.



पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेवर रविवारी स. १०.३५ ते दु. ३.३५ वाजेपर्यंत सांताक्रूझ ते माहीम दरम्यान मेगाब्लॉक असेल.

अप आणि डाउन फास्टवर हा ब्लॉक असल्याने या काळात फास्ट लोकल स्लो मार्गावरून चालवण्यात येणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज