अ‍ॅपशहर

महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता; जाणून घ्या संपूर्ण यादी...

मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 May 2022, 12:38 pm
मुंबई : केरळसह दक्षिण भारतातील काही राज्यांना पावसाने झोडपून काढलेलं असताना महाराष्ट्रातीलही नऊ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच मोसमी पावसाची प्रगती वेगाने होत असल्याने पुढील काही तासांमध्ये हा पाऊस अंदमान आणि निकोबार बेटांवर धडक देण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update Today)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rain yellow alert
पावसाचा इशारा


राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावेल, असं हवामान खात्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

Sanjay Raut: देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील भाषणानंतर संजय राऊतांचं ट्विट, म्हणाले...

केरळमध्ये मुसळधार पावसाची हजेरी

नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन होण्याच्या अपेक्षेच्या काही दिवस आधीच केरळमध्ये पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी पाच जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचे संकेत देऊन हवामान खात्याने येथे रेड अॅलर्ट जारी केला आहे. एर्नाकुलम, इडुक्की, त्रिचूर, मलप्पुरम, कोझिकोडे जिल्ह्यांना रविवारसाठी तर एर्नाकुलम, इडुक्की, त्रिचूर, कोझिकोडे, कन्नूर या जिल्ह्यांना सोमवारसाठी हा इशारा देण्यात आला. आणीबाणीच्या कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे महसूलमंत्री के. राजन यांनी पत्रकारांना सांगितले.

देशातील कोणत्या राज्यांना पावसाचा तडाखा?

अनेक राज्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून केरळसह मेघालय, आसाम आणि पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. दुसरीकडे, उत्तर भारतात मात्र उष्णतेची लाट कायम असल्याचं चित्र आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज