महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सकाळी पावणेदहाच्या सुमारास डी. एन. नगर स्थानकात ट्रॅकवर उतरल्याने घाटकोपर वर्सोवा मेट्रो मार्गावरील वाहतूक किमान २० मिनिटे खोळंबली. सकाळी नऊ वाजून ४५ मिनिटांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्थानकात प्रवेश केला. काही कार्यकर्ते थेट ट्रॅकवर उतरले. त्यांना बाहेर काढण्यासाठी मेट्रोचे सुरक्षा रक्षक पुढे सरसावले. पुढील १० ते १५ मिनिटे घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी ट्रॅकवरच ठिय्या मांडला होता. त्यांना बाहेर काढल्यानंतर दहा वाजून पाच मिनिटांनी मेट्रो सेवा पूर्ववत सुरू झाली. डी. एन. नगर हे मेट्रोचे गजबजलेले स्थानक असल्याने सकाळच्या वेळेस स्थानकात गोंधळ उडाला होता. मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मानो रेलच्या भक्ती पार्क स्थानकातही प्रयत्न केला.
मेट्रो खोळंबली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सकाळी पावणेदहाच्या सुमारास डी एन...
Maharashtra Times 11 Sep 2018, 4:00 am