१०० टक्के एलईडी दिव्यांचा वापर... नैसर्गिक उर्जेचा जास्तीत जास्त वापर... सौरऊर्जा... कार्बन उत्सर्जनाला अटकाव... जिने व लिफ्टसाठी व्ही. व्ही. एफ. तंत्रज्ञानाचा वापर... यासारख्या उपाययोजनांमुळे डी. एन. नगर ते मंडाळा, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व व दहिसर ते डी. एन. नगर या मेट्रो मार्गांवरील ५२ स्थानके 'हरित स्थानके' म्हणून ओळखली जाणार आहेत. ही स्थानके इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या ग्रीन एमआरटीएस मानांकनानुसार विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे या स्थानकांना 'हरित प्रमाणपत्र' मिळणार आहे.
मेट्रोची ५२ स्थानके होणार हरित
१०० टक्के एलईडी दिव्यांचा वापर नैसर्गिक उर्जेचा जास्तीत जास्त वापर सौरऊर्जा कार्बन उत्सर्जनाला अटकाव जिने व लिफ्टसाठी व्ही व्ही एफ...
Maharashtra Times 11 Aug 2018, 4:00 am