अ‍ॅपशहर

कर्नल पुरोहितांनी तुरुंगात 'असे' काढले ९ वर्ष

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ले. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांनी जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातील ९ वर्षांची कहाणी कथन केली. 'केवळ लष्करी शिस्तीमुळेच एवढे वर्ष तुरुंगात काढू शकलो', असं पुरोहित म्हणाले.

Maharashtra Times 24 Aug 2017, 2:33 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम military disciplinekept me going in jail for 9 yrs
कर्नल पुरोहितांनी तुरुंगात 'असे' काढले ९ वर्ष


मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ले. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांनी जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातील ९ वर्षांची कहाणी कथन केली. 'केवळ लष्करी शिस्तीमुळेच एवढे वर्ष तुरुंगात काढू शकलो', असं पुरोहित म्हणाले.

'तुरुंगात व्यायाम करणं आणि वाचण्याबरोबरच एक डायरीही सोबत ठेवत होतो. खाण्यापिण्याच्या विशेष नियमांचे पालन करत राहिलो. एक तासाच्या मॉर्निंग वॉकनंतर दीड तास वेट ट्रेनिंग करत होतो', असं पुरोहित म्हणाले. लष्करातील निवृत्त गुप्तचर अधिकारी असलेल्या पुरोहितांच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. संवेदनशील भागात तैनात असताना त्यांच्या गुडघ्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. तुरुंगातील वैद्यकीय तपासणीनंतरच पुरोहित यांना व्यायामाची परवानगी मिळाली होती.

'मी चार सत्रात वाचन करत होतो. लष्कराच्या प्रेसमधील व्यावसायिक पुस्तकं सकाळी वाचायचो. नंतर वन, पर्यावरण आणि वन्यजीवांबद्दल वाचायचो. यानंतर लष्करी नेत्यांचे चरित्र आणि त्यांचे विचार आणि रात्री पु. ल. देशपांडेंची पुस्तकं वाचायचो', असं पुरोहित म्हणाले.

'शास्त्रीय संगीत शिकलोय. यामुळे रोज संध्याकाळी मी गायनाचा सराव करायचो. तानपुऱ्यावरील रियाजासाठी रोज वेळ काढायचो. यासोबत डायरी लिहिण्याची सवयही कायम ठेवली', अशी माहिती पुरोहित यांनी दिली.

पुरोहित यांना सशस्त्र सुरक्षा देण्यात आली आहे. 'पुरोहित यांच्यावरील खटला हा अतिशय संवेदनशील आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षेवर आमचे अधिक लक्ष आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुरोहित यांना लष्कराच्या पुण्यातील गुप्तचर विभागाच्या दक्षिण कमांडला रिपोर्ट करण्यास सांगितले आहे. तिथे ते सुरुवातीला सेवेत होते', अशी माहिती, दिल्लीतील लष्कराच्या मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. निलंबित असलेल्या पुरोहित यांना शिस्त आणि सतर्कतेचे निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्बंधांमुळे सेवेत कुठलीही बढती मिळण्यास ते अपात्र असतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज