अ‍ॅपशहर

​ विदर्भात शिवसेनेला बच्चू कडू यांची साथ?

नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणूकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाल्याने शिवसेनेने आता विदर्भावर लक्ष केंद्रीत करण्याची रणनिती आखायला सुरुवात केली आहे.भाजपाला सशक्त पर्याय देण्यासाठी विदर्भातील छोट्यामोठ्या पक्षांना हाताशी धरण्यास शिवसेनेने सुरुवात केली असून यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या दरम्यान आज मातोश्री निवासस्थानी होणाऱ्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Times 10 Dec 2016, 12:18 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mla bacchu kadu will meet shivsena supremo
​ विदर्भात शिवसेनेला बच्चू कडू यांची साथ?

नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणूकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाल्याने शिवसेनेने आता विदर्भावर लक्ष केंद्रीत करण्याची रणनिती आखायला सुरुवात केली आहे.भाजपाला सशक्त पर्याय देण्यासाठी विदर्भातील छोट्यामोठ्या पक्षांना हाताशी धरण्यास शिवसेनेने सुरुवात केली असून यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या दरम्यान आज मातोश्री निवासस्थानी होणाऱ्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आज दुपारी साडे बाराच्या दरम्यान बच्चू कडू मातोश्रीवर पोहचणार आहेत.राज्यात होऊ घातलेल्या आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत युती करण्याबाबत उद्धव ठाकरे आणि बच्चू कडू यांच्यात चर्चा होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. भाजपाला विदर्भात आक्रमकपणे उत्तर देणाऱ्या नेतृत्वाची शिवसेनेला गरज आहे. तर राज्यात संघटनेचा विस्तार करण्यासाठी कडू यांना शिवसेनेची सोबत हवी आहे. त्यामुळे शिवसेना आणि प्रहार संघटनेची युती होणार असून त्याबाबतची घोषणाही आजच होणार असल्याचे कळते. या शिवाय सध्या सुरु असलेल्या विधानसभा अधिवेशनात भाजपाची कोंडी करण्यावरही या दोघांमध्ये चर्चा होणार असल्याचे समजते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज