अ‍ॅपशहर

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; मेट्रो ३ची पहिली गाडी लवकरच मुंबईत येणार; मुहूर्त ठरला

बहुप्रतीक्षित कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेवरील चाचण्यांसाठी एक प्रोटोटाइप गाडी या महिन्याच्या अखेरीस मुंबईत दाखल होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे लवकरच मेट्रो मार्गिकेच्या चाचण्यांना सुरवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 11 Jul 2022, 7:06 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः बहुप्रतीक्षित कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेवरील चाचण्यांसाठी एक प्रोटोटाइप गाडी या महिन्याच्या अखेरीस मुंबईत दाखल होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे लवकरच मेट्रो मार्गिकेच्या चाचण्यांना सुरवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai-metro


मेट्रो ३ मार्गिकेवरील गाडीच्या चाचणीसाठी डिसेंबर २०२१ अखेर पहिली मेट्रो गाडी मुंबईत दाखल होईल, असे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) सांगण्यात आले होते. मात्र मरोळ येथे उभारण्यात येत असलेल्या तात्पूरत्या कारशेडचे काम अपूर्ण असल्याने डिसेंबरमध्ये गाडी मुंबईत दाखल होऊ शकली नाही. त्यानंतर यंदा मार्चमध्ये ही गाडी येईल, असे एमएमआरसीएलने सांगण्यात आले होते. मात्र हा मुहूर्तही हुकला.

मेट्रो गाडी तात्पुरत्या कारशेडमध्ये नेण्यासाठी मार्गातील काही झाडांच्या फांद्या तोडाव्या लागणार आहेत. त्याला पालिकेकडून परवानगी मिळण्यासाठी विलंब होत असल्याने गाडी मुंबईत दाखल होऊ शकली नाही. सद्यस्थितीत आंध्र प्रदेश येथील कारखान्यात गाड्या तयार आहेत. या महिनाअखेरीस या गाड्या मुंबईत आणण्यात येणार आहेत.

दरम्यान राज्यात नवे सरकार आल्यानंतर त्यांनी आरेमध्येच मेट्रो ३ चे कारशेड उभारणीला हिरवा कंदील दाखविला आहे. तसेच मेट्रो ३ मार्गिकेचा सीप्झ ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू करण्याचे एमएमआरसीएलने जाहीर केले आहे. त्यादृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली आहे.

सुरुवातीस तात्पुरत्या कारशेडवर

मेट्रो गाडी मुंबईत आणून तिच्या चाचण्यांना सुरवात केली जाणार आहे. येत्या महिनाअखेरीपर्यंत ही मेट्रो गाडी मुंबईत दाखल होण्याची चिन्हे आहेत. आरे येथे उभारलेल्या तात्पुरत्या मेट्रो कारशेडच्या जागेवर गाडी आणण्यात येणार आहे. तेथून पुढे मार्गिकेवरील गाडीच्या चाचण्यांना सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

महत्वाचे लेख