म. टा. प्रतिनिधी, मुंबई
पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्थानकात सायंकाळी गर्दीच्या वेळेत २४ वर्षीय तरुणीचा विनयभंग घडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी मुझहीद राशिद सय्यद या तरुणाला अटक केली असून अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सांताक्रुझ येथे राहणारी रुक्मिणी सिंह या तरुणीने सोमवारी, २४ डिसेंबर रोजी मिरारोड स्थानकातून सहा वाजून ४३ मिनिटांनी अंधेरीला जाण्यासाठी धीम्या लोकलमध्ये प्रवेश केला. अंधेरीला फलाट क्रमांक चार वर उतरून सांताक्रुझला जाण्यासाठी रुक्मिणी फलाट क्रमांक एकच्या दिशेने पादचारी पुलावरून चालत निघाली. यावेळी पादचारी पुलावर आरोपीने तरुणीचा हात पकडला. पहिल्यांदा गर्दीमुळे हात लागला असल्याचे समजत तरुणीने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र सलग तिसऱ्यांदा आरोपीने हात पकडत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणीने प्रसंगावधान राखत आरोपीला पकडून अंधेरी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.
मूळ बिहार येथे राहणारा आरोपी मुझहीद सध्या विलेपार्ले येथील स्लोजिंग रोड येथे राहत आहे. आरोपीने केलेल्या कृत्याची कबूली दिली असून आरोपी विरोधात अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.