अ‍ॅपशहर

नेव्हीनगरमध्ये पैसेवाटप झालेलेच नाही

कफ परेडच्या नेव्हीनगर येथील नोफ्रा भागातील प्रभाग क्र.२२७ मधील भाजप उमेदवार मकरंद नार्वेकर यांचे कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटप करत असल्याची तक्रार रविवारी ‌शिवसेनेतर्फे करण्यात आली. मात्र, पैसे वाटपाचा कुठलाही प्रकार झाला नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले.

Maharashtra Times 20 Feb 2017, 4:54 am
मुंबई ः कफ परेडच्या नेव्हीनगर येथील नोफ्रा भागातील प्रभाग क्र.२२७ मधील भाजप उमेदवार मकरंद नार्वेकर यांचे कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटप करत असल्याची तक्रार रविवारी ‌शिवसेनेतर्फे करण्यात आली. मात्र, पैसे वाटपाचा कुठलाही प्रकार झाला नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mony distribution incident not happend in nevynagar
नेव्हीनगरमध्ये पैसेवाटप झालेलेच नाही


तक्रारदारांनी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये भाजपचे कार्यकर्ते पत्रक वाटताना दिसत होते. पत्रक वाटणाऱ्या महिलेच्या पर्समध्ये पैसे दिसत होते. मात्र, पैसे वाटत असल्याचा कोणताही प्रकार झाला नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. कफ परेड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, नार्वेकर यांनी पैसे वाटप केल्याचा इन्कार केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज