अ‍ॅपशहर

​ ‘मूड इंडिगो’ची जल्लोषात सांगता

कॉलेज विश्वात चर्चेत असणाऱ्या भव्यदिव्य मूड इंडिगो फेस्टिव्हलची दिमाखदार सांगता झाली ती ठाण्याच्या ‘तेजोमय’ संस्थेच्या जल्लोषमय लोकनृत्याने. तीस मराठी आणि गुजराती मुलांच्या या संस्थेने फेस्टिव्हलच्या अखेरच्या दिवशी सहा वेगवेगळी लोकनृत्ये सादर करून तरुण प्रेक्षकवर्गाला त्यांच्या तालावर थिरकवले. घुमर, बिहू, गरबा आदी राजस्थानी, गुजराती नृत्य प्रकारांचा यात समावेश होता. वैविध्यपूर्ण भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या मूड इंडिगोचे ‘महाराष्ट्र टाइम्स’ मीडिया पार्टनर होते.

Maharashtra Times 26 Dec 2017, 4:38 am
थिरकले मराठी पाय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mood indigo festival ends
​ ‘मूड इंडिगो’ची जल्लोषात सांगता


टीम कॉलेज क्लब रिपोर्टर

मुंबई: कॉलेज विश्वात चर्चेत असणाऱ्या भव्यदिव्य मूड इंडिगो फेस्टिव्हलची दिमाखदार सांगता झाली ती ठाण्याच्या ‘तेजोमय’ संस्थेच्या जल्लोषमय लोकनृत्याने. तीस मराठी आणि गुजराती मुलांच्या या संस्थेने फेस्टिव्हलच्या अखेरच्या दिवशी सहा वेगवेगळी लोकनृत्ये सादर करून तरुण प्रेक्षकवर्गाला त्यांच्या तालावर थिरकवले. घुमर, बिहू, गरबा आदी राजस्थानी, गुजराती नृत्य प्रकारांचा यात समावेश होता. वैविध्यपूर्ण भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या मूड इंडिगोचे ‘महाराष्ट्र टाइम्स’ मीडिया पार्टनर होते.

‘ला फेते दा कार्निव्हल’ म्हणनेच फेस्टिवल ऑफ कार्निव्हल अशी हटके थीम असणारा हा फेस्टिव्हल यंदाही जल्लोषमय वातावरणात पार पडला. आयआयटी कॅम्पसमध्ये ठिकठिकाणी रंगलेल्या स्पर्धा, कॉन्सर्ट, इन्फॉर्मल्स इव्हेंट्स यांमुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना कार्निव्हल अनुभवायला मिळाला. फेस्टिव्हलमध्ये गायन, नृत्य, नाट्य, बँड आदी अनेक स्पर्धा यंदाही आयोजित करण्यात आल्या होत्या. तरुणाईला आपली कला देशभरातील हजारो विद्यार्थ्यांसमोर सादर करण्याची उत्तम संधी ‘मूड इंडिगो’च्या माध्यमातून यावेळी मिळाली.

चटकदार… चमचमीत

अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीसोबतच खवय्यांना आपल्या जिभेचे चोचले पुरवण्याची संधी मिळाली ती ‘शेफ्स कॉर्नर’ या भन्नाट इव्हेंटमध्ये. सलग तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांना परीक्षकांकडून विविध आव्हाने देण्यात आली होती. पदार्थ बनवण्याच्या या स्पर्धेत तरुणाईच्या कल्पकतेला वाव मिळावा आणि खाद्य संस्कृतीविषयी त्यांनाही माहिती मिळावी हा यामागचा मूळ हेतू होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज