अ‍ॅपशहर

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आणखी २६५ सरकते जिने

एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर प्रवासी सुविधांवर रेल्वेने भर दिला आहे. पुढील वर्षअखेरपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर नवीन २६५ सरकत्या जिन्यांची भर पडणार आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार आणि मध्य-हार्बरवर सीएसएमटी ते खोपोली, कर्जत, कसारा आणि पनवेलपर्यंत विविध स्थानकांवर सरकत्या जिन्यांमध्ये वाढ होणार आहे

Maharashtra Times 29 Sep 2018, 3:15 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम escalator


एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर प्रवासी सुविधांवर रेल्वेने भर दिला आहे. पुढील वर्षअखेरपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर नवीन २६५ सरकत्या जिन्यांची भर पडणार आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार आणि मध्य-हार्बरवर सीएसएमटी ते खोपोली, कर्जत, कसारा आणि पनवेलपर्यंत विविध स्थानकांवर सरकत्या जिन्यांमध्ये वाढ होणार आहे.

स्थानक, प्लॅटफॉर्मवरील गर्दी त्वरेने कमी होण्याच्या दृष्टीने सरकते जिने महत्त्वाचे ठरतात. ज्येष्ठ नागरिक, अपंग प्रवाशांप्रमाणेच अन्य प्रवाशांनी सरकत्या जिन्यास पसंती दिली आहे. त्यामुळे रेल्वेकडून जवळपास सर्वच स्थानकांवर सरकत्या जिन्यांची संख्या वाढवली जाणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अनुक्रमे १७६ आणि ८९ असे २६५ नवीन सरकते जिने उभारले जाणार आहेत.

मध्य रेल्वे

- ६९ सरकत्या जिन्यांची घोषणा

- ऑक्टोबर, २०१८पर्यंत ५८ पूर्णत्वास

- शिल्लक-११

- १७६ नवीन सरकते जिने

पश्चिम रेल्वे

- ३४ सरकत्या जिन्यांची घोषणा

- ऑक्टोबर, २०१८पर्यंत २८ पूर्ण

- शिल्लक - पाच

- ८९ नवीन सरकते जिने

एकूण लिफ्ट

- गेल्या वर्षभरात २८ ठिकाणी उभारणी

- पाच लिफ्टची कामे सरू

- सन २०१९पर्यंत ५४चे लक्ष्य

एका सरकत्या जिन्यासाठी एक कोटी रु.

सरकत्या जिन्याची क्षमता प्रतितास ९ हजार आहे. एक सरकता जिना बसवण्यासाठी साधारण १ कोटी रु. खर्च अपेक्षित आहे. त्यात यंत्राची किमतीसह बांधणीच्या खर्चाचाही समावेश आहे. त्यासाठी योग्य जागा निवडण्यापासून सुरुवात होते. सरकता जिना प्रत्यक्ष बसवण्यासाठी सुमारे महिन्यापेक्षाही अधिक कालावधी लागतो. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मॉल आदींप्रमाणेच रेल्वे स्थानकातील जिन्यांची रचना असते. या जिन्यांचा वेग प्रति मिनिट ०.५ मीटर असतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज