अ‍ॅपशहर

प्रियकराने संशय घेतल्याने 'तिने' बाळाला मारलं

रिक्षामध्ये दीड महिन्यापूर्वी सापडलेल्या मृत मुलीच्या आईचा शोध घेण्यात वांद्रे पोलिसांना यश आले आहे. अल्पवयीन मातेनेच या बाळाची हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या मातेला ताब्यात घेतले असून प्रियकराने संशय घेतल्यामुळे बाळाला मारल्याचे तिने चौकशीत सांगितले.

Dipesh More | Maharashtra Times 22 Dec 2019, 4:52 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : रिक्षामध्ये दीड महिन्यापूर्वी सापडलेल्या मृत मुलीच्या आईचा शोध घेण्यात वांद्रे पोलिसांना यश आले आहे. अल्पवयीन मातेनेच या बाळाची हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या मातेला ताब्यात घेतले असून प्रियकराने संशय घेतल्यामुळे बाळाला मारल्याचे तिने चौकशीत सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम arrest


वांद्रे पश्चिमेकडील कुरेशी नगरमधील मैदानात उभ्या असलेल्या एका रिक्षामध्ये ३१ ऑक्टोबर रोजी एक ते दीड महिन्यांची मुलगी मृतावस्थेत सापडली होती. या मुलीची गळा आवळून हत्या केल्याचे वैद्यकीय अहवालातून स्प्ष्ट झाल्यानंतर वांद्रे पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ आणि निरीक्षक मनोहर धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मुलीची हत्या करून तिचा मृतदेह रिक्षात फेकणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. पोलिसांनी सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांची झाडाझडती घेऊन याठिकाणी जन्मलेल्या मुलींची माहिती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सर्व प्रार्थनास्थळे येथील पाहणी करीत असताना एका भिक्षेकरीने पोलिस कॉन्स्टेबल आनंद निकम आणि अशोक पाटील यांना एका अल्पवयीन मुलीबाबत पुसटशी माहिती दिली. पोलिसांनी वांद्रे परिसरातून या अल्पवयीन मुलीला शोधून काढले. त्यानंतर तिने रुमालाने गळा आवळून मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. प्रियकर हे मूल आपले नसल्याचे सांगून तिच्यावर संशय घेऊ लागला होता. त्यामुळे मुलीला कसे वाढवायचे आणि बदनामीची भीती यामुळे मुलीची हत्या केल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

लेखकाबद्दल
Dipesh More

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज