अ‍ॅपशहर

राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा मुंबईत

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सुरू झालेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आत्मक्लेश यात्रा आज दक्षिण मुंबईत दाखल झाली. परळ इथल्या शिरोडकर हायस्कूलपासून ते राजभवनपर्यंत ५ हजार शेतकरी राजभवनाकडे जाणार आहेत. या मार्गावर त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

Maharashtra Times 30 May 2017, 3:29 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mp raju shettys atmaklesh yatra moving towards rajbhavan traffic jam in mumbai
राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा मुंबईत

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सुरू झालेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आत्मक्लेश यात्रा आज दक्षिण मुंबईत दाखल झाली. परळ इथल्या शिरोडकर हायस्कूलपासून ते राजभवनपर्यंत ५ हजार शेतकरी राजभवनाकडे जाणार आहेत. या मार्गावर त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी भरून दिलेले कर्जमुक्तीचे अर्ज राज्यपालांना देणार आहेत. पुण्यातून २२ मे रोजी खासदार राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेला सुरुवात झाली. पुण्यातील फुले वाड्यात महात्मा फुलेंच्या प्रतिमेला अभिवादन करुन आत्मक्लेश यात्रा मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती.

शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणाऱ्या मुंबई ते नागपूर समृद्धी हायवेला विरोध, सातबारा उतारा कोरा करा, कर्जमुक्ती द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा इत्यादी मागण्या घेऊन खासदार शेट्टी यांनी या यात्रेला सुरुवात केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज