अ‍ॅपशहर

दिवाळीला गावी जाणाऱ्यांची एसटी संपाने कोंडी

ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आज दुसऱ्या दिवशीही सुरूच असल्याने दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. दरम्यान, संपकरी कर्मचाऱ्यांवर सरकारने कारवाईच्या हालचाली सुरू केल्या असल्या तरी कर्मचारी संघटना माघार घेण्यास तयार नसल्याने परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Times 18 Oct 2017, 10:22 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम msrtc employees strike over 7th pay commission implementation enters second day
दिवाळीला गावी जाणाऱ्यांची एसटी संपाने कोंडी

ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आज दुसऱ्या दिवशीही सुरूच असल्याने दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. दरम्यान, संपकरी कर्मचाऱ्यांवर सरकारने कारवाईच्या हालचाली सुरू केल्या असल्या तरी कर्मचारी संघटना माघार घेण्यास तयार नसल्याने परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

संपावर गेलेले कर्मचारी आज कामावर हजर न झाल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्याजागी कंत्राटी कामगारांची भरती करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. मात्र, त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. आजही राज्यभरात एसटीचा कडकडीत बंद दिसत आहे. एकही एसटी बस रस्त्यावर उतरलेली नाही.

दरम्यान, नाशिकमध्ये संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू झाली असून वाहन-चालकांना विश्रामगृह रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांची कोंडी करण्यासाठी असे पाऊल अन्य ठिकाणीही उचलले जाईल, असे सांगण्यात आले.

तोडगा काढण्यासाठी नव्याने चर्चा

संपावर तोडगा काढण्यासाठी प्रशासन आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आज नव्याने चर्चा होत आहे. सर्व संघटना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीवर ठाम असून त्याबाबत कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका या संघटना या बैठकीतही मांडणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज