अ‍ॅपशहर

मतदार असाल तर मिळेल डिग्री कॉलेजात प्रवेश?

डिग्री कॉलेजात प्रवेश मिळवायला काय आवश्यक असतं? बारावीला उत्तम टक्के. नाही, केवळ टक्के मिळवून प्रवेशाचं स्वप्न पाहत असाल तर सावध व्हा. पुढच्या वर्षीपासून डिग्री प्रवेशासाठी तुमचं नाव मतदार यादीत आहे का याची विचारणा केली जाणार आहे. मुंबई विद्यापीठानं तसा आदेश काढला आहे.

Yogita Rao | Maharashtra Times 20 Mar 2017, 5:27 pm
टीएनएन । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mu circular are you a voter colleges to ask admission seekers from next year
मतदार असाल तर मिळेल डिग्री कॉलेजात प्रवेश?

डिग्री कॉलेजात प्रवेश मिळवायला काय आवश्यक असतं? बारावीला उत्तम टक्के. नाही, केवळ टक्के मिळवून प्रवेशाचं स्वप्न पाहत असाल तर सावध व्हा. पुढच्या वर्षीपासून डिग्री प्रवेशासाठी तुमचं नाव मतदार यादीत आहे का याची विचारणा केली जाणार आहे. मुंबई विद्यापीठानं तसा आदेश काढला आहे.

पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणारे बहुतांश विद्यार्थी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले असतात. त्यामुळे मतदार यादीत नाव असणं बंधनकारक करावं का याविषयीचा सल्लाही विद्यापीठानं सर्व संलग्न महाविद्यालयांकडून मागवला आहे. महाविद्यालयांनी प्रवेश अर्जात हा नवा पर्याय समाविष्ट करावा, असे परिपत्रक विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागानं काढलं आहे. तरुण मतदारांची संख्या वाढावी यासाठी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या अभियानांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.

'पदवी महाविद्यालयांचे प्रवेश ऑनलाइन होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मतदार यादीचे तपशील त्यांच्या प्रवेश अर्जात समाविष्ट करण्यात अडचण येणार नाही. पण यामुळे मूळ हेतू साध्य होईल का याबद्दल साशंकता आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मतदार नोंदणीबाबत जनजागृती करतच असतात. शिवाय मतदार यादीत नाव नाही म्हणून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अपात्र ठरवता येणार नाही,' असे सेंट अँड्र्यूज महाविद्यालयाच्या प्राचार्य मेरी फर्नांडीस म्हणाल्या.
लेखकाबद्दल
Yogita Rao

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज