अ‍ॅपशहर

Abu Salem: अबू सालेमचा पॅरोल अर्ज फेटाळला

१९९३मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अबू सालेमचा पॅरोल अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला. मुंब्रा येथील कौसर बहार हिच्याशी लग्न करण्यासाठी ४५ दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात यावा, यासाठी त्यानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Aug 2018, 12:30 pm
मुंबई:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम abu-salem


१९९३मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अबू सालेमचा पॅरोल अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला. मुंब्रा येथील कौसर बहार हिच्याशी लग्न करण्यासाठी ४५ दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात यावा, यासाठी त्यानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

तळोजा तुरुंगात असलेल्या सालेमनं प्रशासनाकडे पॅरोलसाठी अर्ज केला होता. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव तो अमान्य केला होता. त्याला सालेमनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. सालेमच्या या याचिकेवर न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरमानी आणि न्यायाधीश महेश सोनक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. कोकण विभागीय आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सालेमचा पॅरोल अर्ज नामंजूर केला होता, असा युक्तिवाद त्याच्या वकील फरहाना शाह यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज